Saif Ali Khan : सैफ अली खानच्या 'Devara'चा फर्स्ट लूक आऊट! वाढदिवशी चाहत्यांना खास भेट
Devara Poster Out : सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) आगामी 'देवरा' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
![Saif Ali Khan : सैफ अली खानच्या 'Devara'चा फर्स्ट लूक आऊट! वाढदिवशी चाहत्यांना खास भेट Saif Ali Khan Devara First Look Out Devara New Poster Jr NTR Shares Saif Ali Khan First Look From The Film Saif Ali Khan birthday movie bollywood entertainment Saif Ali Khan : सैफ अली खानच्या 'Devara'चा फर्स्ट लूक आऊट! वाढदिवशी चाहत्यांना खास भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/16/5376890d215abc15a9db16938cdb8b051692183622120254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Saif Ali Khan Devara First Look Out : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खाननेदेखील (Karina Kapoor Khan) सैफसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान सैफच्या आगामी 'देवरा' (Devara) या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. वाढदिवशी फर्स्ट लूक आऊट करत अभिनेत्याने चाहत्यांना खास भेट दिली आहे.
सैफ अली खानच्या वाढदिवशी त्याच्या आगामी 'देवरा' या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. 'देवरा' हा सैफचा दाक्षिणात्य सिनेमा असणार आहे. 'देवरा' या सिनेमात सैफ अली खानसह ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) आणि जान्हवी कपूरदेखील (Janhvi kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'देवरा' या सिनेमातील सैफ अली खानचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लूकने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लांबलचक केसमध्ये सैफचा सीरियस मोड पाहायला मिळत आहे. 'देवरा' या सिनेमात सैफ अली खान भैरा या भूमिकेत झळकणार आहे. सैफचा फर्स्ट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमात अभिनेत्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
सैफ अली खान, ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर अभिनित 'देवरा' हा सिनेमा 5 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ज्युनिअर एनटीआरच्या 'देवरा' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती ज्युनिअर एनटीआरच्या विरोधात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर ज्युनिअर एनटीआर आणि सैफ अली खान एकमेकांच्या विरोधात दिसतील. आता सिनेप्रेमींना आणि सैफच्या चाहत्यांना या बहुचर्चित सिनेमाची उत्सुकता आहे.
ज्युनिअर एनटीआरने 'देवरा' या सिनेमातील सैफ अली खानचं पोस्टर आऊट करत अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्युनिअर एनटीआरने शुभेच्छा देत लिहिलं आहे,"भैरा...वाढदिवसाच्या शुभेच्छा सैफ सर". 'देवरा'चं पोस्टर आऊट झाल्यानंतर सैफ अली खान ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे.
BHAIRA
Happy Birthday Saif sir !#Devara pic.twitter.com/DovAh2Y781
">
संबंधित बातम्या
Saif Ali Khan Birthday: ओंकारा 'ते' फँटम; सैफ अली खानचे हे चित्रपट नक्की बघा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)