Janhvi Kapoor : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूरचं जोडलं जातंय नाव; व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण
Janhvi Kapoor : जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. पण सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करत आहे.
जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत आहेत. नुकतेच ते अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये स्पॉट झाले.
अनंत आणि राधिका यांच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. जान्हवी आणि शिखरने एकत्र पार्टीत एन्ट्री केली आहे.
साखरपुड्याच्या पार्टीआधी जान्हवी आणि शिखर बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत स्पॉट झाले होते. त्यावेळी बोनी कपूर आणि शिखर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
View this post on Instagram
शिखर पहाडिया कोण आहे?
शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशील कुमार शिंदे यांची लेक स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा मुलगा शिखर आहे. गेल्या काही दिवसांपासून शिखर आणि जान्हवी रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. आता पुन्हा ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
'कॉफी विथ करण 7' या लोकप्रिय कार्यक्रमात करण जौहरने दोघांच्या नात्यासंदर्भात भाष्य केलं होतं. जान्हवी आणि शिखर 2016 मध्ये एकमेकांना डेट करत होते. पण अभिनयाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण आता ते पुन्हा एकत्र आल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या
Janhvi Kapoor Photo: जान्हवी कपूरच्या बोल्डनेसची चर्चा, टाइट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
