Prajakta Mali: योगा दिनानिमित्त प्राजक्तानं घातले 108 सूर्यनमस्कार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, 'सालाबादप्रमाणे यंदाही...'
प्राजक्तानं (Prajakta Mali) 108 सूर्यनमस्कार घालते आहेत.

Prajakta Mali: प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. विविध मुलाखतींच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना फिटनेसबाबत टिप्स देते. प्राजक्ता ही दरवर्षी योगा दिनानिमित्त 108 सूर्यनमस्कार घालते. यंदाही प्राजक्तानं 108 सूर्यनमस्कार घालते आहेत. प्राजक्तानं तिचा सूर्यनमस्कार घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्राजक्तानं तिचा सूर्यनमस्कार घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, सालाबादप्रमाणे यंदाही 108 सूर्यनमस्कार घातले. हा आहे पुरावा.
योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा नाहीत.'
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्राजक्ता म्हणते, 'सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा, योग दिनानिमित्त आज आपण 108 सूर्यनमस्कार घालणार आहोत. 12 सूर्यनमस्कार दररोज घाला. फक्त योग दिन आहे म्हणून सूर्यनमस्कार घालू नका. मी योगा करते, त्याचे फायदे मी अनुभवले आहेत. 108 या आकड्याला भारतात महत्व आहे. आपण जप पण 108 वेळा करतो. त्यामुळे आपण सूर्यनमस्कार हे 108 वेळा करणार आहोत. '
पुढे व्हिडीओमध्ये प्राजक्ता म्हणते, मी गेल्या वर्षी 108 सूर्यनमस्कार घातले होते. आता एक वर्षानंतर मी पुन्हा 108 सूर्यनमस्कार घालत आहे. त्यामुळे थोडी धाकधूक वाट आहे.'
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
प्राजक्ताचे चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी तिची रानबाझार ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार या सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक लोकांनी कौतुक केलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. या कार्यक्रमाचं ती सूत्रसंचालन करते. तसेच तिचा लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
