एक्स्प्लोर

Happy Birthday Jackie Shroff: 'बॉलिवूडच्या भिडू'वर आलेली चाळीत राहण्याची वेळ; जाणून घ्या जॅकी श्रॉफच्या संघर्षाची कहाणी...

Jackie Shroff : 'बॉलिवूडचा भिडू' अशी ओळख असलेल्या जॅकी श्रॉफचा आज वाढदिवस आहे.

Jackie Shroff Birthday : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आज वाढदिवस आहे. 'बॉलिवूडचा भिडू' अशी ओळख असलेला जॅकी रोमॅंटिक हीरोपासून ते अॅक्शन हिरोपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या चार दशकांपासून जॅकी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

जॅकीचा हीरोपर्यंत प्रवास...

जॅकी श्रॉफने आपल्या करिअरच्या टप्प्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. जॅकीने 1973 साली 'हीरा पन्ना' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर 1982 साली 'स्वामी दादा' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केलं. त्याचे हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. पण 1983 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'हीरो' (Hero) या सिनेमाने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 

जॅकी श्रॉफचे लोकप्रिय सिनेमे (Jackie Shroff Popular Movies) 

जॅकी श्रॉफने आजवर 150 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नव्वदच्या दशकातील सुपरहिट अभिनेत्यांच्या यादीत जॅकी श्रॉफची गणना होते. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांना आपलसं केलं आहे. रुपेरी पडद्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारत त्याने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 'सौदागर', 'राम लखन', 'रंगीला', 'बॉर्डर', 'रुप की राणी चोरों का राजा' असे अनेक सुपरहिट सिनेमे जॅकीने बॉलिवूडला दिले आहेत. त्याच्या सिनेमांतील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'जग्गु दादा' म्हणून तो बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे.

जॅकी श्रॉफच्या संघर्षाची कहाणी 

जॅकी आज एक लोकप्रिय अभिनेता असला तरी या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. एका मुलाखतीत जॅकी म्हणाला होता, "मला वाटतं एखादी गोष्ट साध्य करताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. आयुष्यात मला ज्या गोष्टी कराव्याश्या वाटल्या, त्या मी आवडीने केल्या आहेत. तुम्हाला कोणत्या गोष्टी योग्य आणि कोणत्या अयोग्य आहेत हे कळल्या पाहिजेत." 

जॅकी पुढे म्हणाला, "माझ्यावरचं कर्ज मी कुटुंबीयांना त्रास न देता स्वत: फेडलं आहे. त्यावेळी आमची परिस्थिती बेताची असली तरी त्याची झळ आम्ही कधीच मुलाबाळांना लागू दिली नाही. कर्ज फेडण्यासाठी घरापासून ते फर्नीचरपासून अनेक गोष्टी विकाव्या लागल्या. त्यावेळी मी मुंबईतील तीन बत्ती येथील चाळीत राहायला गेलो होतो. या चाळीत पाच ते सहा वर्ष काढली." 

जॅकी श्रॉफने हिंदीसह, मराठी, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तामिळ अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांत काम केलं आहे. 'हीरो' सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर जॅकीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. जॅकीचा 'कोटेशन गँग' (Quotattion Gang) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Quotation Gang Trailer: अंगावर शहारे आणणारा 'कोटेशन गँग'चा ट्रेलर रिलीज; सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलVibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget