एक्स्प्लोर

Quotation Gang Trailer: अंगावर शहारे आणणारा 'कोटेशन गँग'चा ट्रेलर रिलीज; सनी लिओनी, जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत

Quotation Gang Trailer : कोटेशन गँग या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री सनी लिओन यांच्यासोबतच अभिनेत्री प्रियामणी देखील कोटेशन गँग या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Quotation Gang Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेत्री सनी लिओन (Sunny Leone) यांच्या कोटेशन गँग (Quotation Gang) या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे तुम्हाला थक्क करतील. कोटेशन गँगच्या ट्रेलरमधील डायलॉग्सना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कोटेशन गँगचा ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की या चित्रपटाचे कथानक गँगवॉरवर आधारित आहे.

ट्रेलरमध्ये सनी लिओनीचा 'एक गँग लीडर ही दूसरे गँग लीडर को मार सकता है' हा डायलॉग ऐकू येतो. तसेच ट्रेलरमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्स बघायला मिळतो. तसेच चित्रपटात जॅकी श्रॉफ यांचा हटके अंदाज देखील पाहायला मिळेल. क्राईम-थ्रिलर चित्रपट कोटेशन गँगच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या ट्रेलरमध्ये फॅमिली मॅन फेम अभिनेत्री प्रियामणीची झलक देखील बघायला मिळत आहे.  हा चित्रपट मुंबई, काश्मीर आणि चेन्नईमध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या गँग्सच्या कथेवर आधारित आहे. 

सनी लिओनीने शेअर केला ट्रेलर

सनी लिओनीने कोटेशन गँग या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करुन तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, "कोटेशन गँगच्या जगात आपले स्वागत आहे" सनीने शेअर केलेल्या या ट्रेलरला अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 

पाहा ट्रेलर

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

हिंदीमध्ये रिलीज होणार कोटेशन गँग

'कोटेशन गँग'चे दिग्दर्शन विवेक कुमार कन्नन यांनी केले आहे. ते या चित्रपटाचे निर्माते देखील आहेत. हा तमिळबरोबरच हिंदी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. जॅकी श्रॉफ हे काही महिन्यांपूर्वी 'फोन भूत' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या चित्रपटात त्यांनी कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. जॅकी श्रॉफ आणि सनी लिओनी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Celebs Childhood Pics: फोटोतील ‘या’ क्युट मुलीला ओळखलंत का? गोविंदा आणि सलमानसोबत दिलेत हिट चित्रपट

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Embed widget