एक्स्प्लोर

Sudarshan Ghule Beed: सुदर्शन घुलेला तारीख पे तारीख! पुन्हा पोलीस कोठडीत धाडलं, व्हॉईस सॅम्पल तपासणार

Beed Crime: खंडणीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वीच वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांची चौकशी झाली आहे. मात्र, सुदर्शन घुले याची चौकशी अद्याप बाकी आहे. त्यासाठी पोलीस कोठडी देण्यात आली.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी असलेल्या सुदर्शन घुले याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सीआयडीने सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यामुळे आता 14 फेब्रुवारीला सुदर्शन घुले याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाईल. खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्यावर आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, आता सीआयडीकडून पोलीस कोठडीत सुदर्शन घुले याची पुन्हा कसून चौकशी केली जाईल. पोलिसांकडून सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणाला पूरक खंडणी प्रकरणाचा गुन्हा आहे. या खंडणी प्रकरणांमध्ये सुद्धा सुदर्शन घुले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणात अद्याप  सुदर्शन घुले याची चौकशी झाली नव्हती म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेला पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वीच वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांची चौकशी झाली आहे. मात्र, सुदर्शन घुलेची चौकशी होणे बाकी होते. सध्या सुदर्शन घुलेला केज शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे या प्रमुख आरोपींना पकडण्यात आले आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी अद्याप फरार आहे. तो बाहेरच्या राज्यात लपून बसल्याचा संशय आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सीआयडी आणि एसआयटी अशा दोन पातळ्यांवर तपास सुरु आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सीआयडीने कोर्टात सांगितले आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या अन्य साथीदारांवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्याप्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. 

आणखी वाचा

परळीतील मतदान केंद्रावर राडा करणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकावर कारवाई, कैलास फडवर गुन्हा दाखल

Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल 1 लाख लिटरने घटलं; सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका?
मराठवाड्यातील दूध संकलन एका महिन्यात तब्बल 1 लाख लिटरने घटलं; सर्वाधिक घट बीड जिल्ह्यात, तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका?
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Embed widget