![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gulmohar Movie : राष्ट्रीय पुरस्कारावर 'गुलमोहर'ची मोहोर; शर्मिला टागोर, अमोल पालेकर यांच्या मुख्य भूमिका
Gulmohar Movie : कौटुंबिक मनोरंजनपट 'गुलमोहर'ने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी) पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
![Gulmohar Movie : राष्ट्रीय पुरस्कारावर 'गुलमोहर'ची मोहोर; शर्मिला टागोर, अमोल पालेकर यांच्या मुख्य भूमिका Gulmohar Movie won 70th National Award for Best Film in Hindi Sharmila Tagore Amol Palekar in lead role Bollywood Entertainment Gulmohar Movie : राष्ट्रीय पुरस्कारावर 'गुलमोहर'ची मोहोर; शर्मिला टागोर, अमोल पालेकर यांच्या मुख्य भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/17/165d3eb1713492ad09ef7cc78b90ae201723902646150720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gulmohar Movie : स्टार स्टुडिओ प्रस्तुत ' गुलमोहर ' (Gulmohar) या पुरस्कार विजेत्या हृदयस्पर्शी कौटुंबिक मनोरंजनपटाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. देशातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट (हिंदी), सर्वोत्कृष्ट संवाद आणि मनोज वाजपेयी यांच्या अभिनयासाठी विशेष उल्लेख पुरस्कार पटकावला आहे.
' गुलमोहर ' चित्रपटामध्ये सुमारे एक दशकानंतर चित्रपटसृष्टीत परतलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शर्मिला टागोर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यासह सिमरन, सूरज शर्मा आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते अमोल पालेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. राहुल व्ही. चित्तेला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचा प्रीमियर शो पाहिल्यानंतर समीक्षक आणि चाहत्यांनी गुलमोहरचे सारख्याच भावनेने कौतुक केले. "उत्साह वाढवणारा चित्रपट", "हृदयाला स्पर्श करणारा चित्रपट", "पोएट्री इन मोशन", "भावनिकदृष्ट्या समृद्ध करणारा चित्रपट", "भव्य!" अशा प्रतिक्रिया सर्वांनीच दिल्या.
'हा एक अवस्मरणीय आनंद...'
चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल व्ही. चीट्टेलाने म्हटलं की, " गुलमोहर या आमच्या लाडक्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे मी सन्मानित झालो आहे. मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता - विशेष उल्लेख पुरस्कार जिंकल्याचा मला आनंद झाला आहे. मनोज वाजपेयी आणि शर्मिला टागोर यांच्याबरोबर चित्रपट करणे एक अविस्मरणीय अनुभव होता. शेवटी मी माझ्या निर्मिती आणि लेखन सहकारी अर्पिता मुखर्जी यांना धन्यवाद देतो. मी स्टार स्टुडिओला धन्यवाद देतो ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला.'
गुलमोहर हा चित्रपट चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि ऑटोनॉमस वर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार स्टुडिओने निर्माण केला आहे. चित्रपटाचे मूळ संगीत सिद्धार्थ खोसला (धीस इज अस) यांनी दिले आहे. राहुल व्ही. चित्तेला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून राहुल व्ही. चित्तेला आणि अर्पिता मुखर्जी यांनी गुलमोहर चित्रपटाचे कथा - पटकथा लेखन केले आहे. गुलमोहर चित्रपट सध्या डिस्ने+ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)