Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला उद्यापासून सुरुवात; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार...
Cannes Film Festival : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'ला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
Cannes 2023 Live Streaming : जगभरातील सिनेप्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची (Cannes Film Festival) प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. यंदाचा फेस्टिव्हल फ्रान्समध्ये 16 मे ते 27 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय होणार आहे.
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कुठे होणार आहे?
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक चांगल्या दर्जाचे सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतील.
View this post on Instagram
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कधी सुरू होणार? (Cannes Film Festival 2023 Date-Time Details)
76 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 16 मे 2023 पासून यंदाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' सुरू होणार आहे. 16 मे पासून सुरू होणारा हा फेस्टिव्हल 27 मे पर्यंत सुरू राहणार आहे. या फेस्टिव्हलला हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत सिनेविश्वातील अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत.
जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सर्वांना उत्सुकता आहे. 16 मेपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. बॉलीवूड सिनेसृष्टीतील ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पदुकोण दरवर्षी या महोत्सावाला हजेरी लावत असतात. यंदा अनुष्का शर्मा आणि मानुषी छिल्लरही या महोत्सावाला उपस्थित राहणार आहेत.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिकीटाची किंमत लाखो रुपये
सेलिब्रिटींशिवाय पत्रकार आणि चित्रपट समीक्षकही कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करुन तिकीट काढावे लागणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठीची तिकीटाची किंमत पाच लाख ते 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्याच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तिकीट बुक करता येते.
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चा ड्रेस कोड काय आहे?
'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. तसेच या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. महिला कॉकटेल ड्रेस परिधान करू शकतात. ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर किंवा भडक रंगाची फॉर्मल ट्राउजर महिला परिधान करू शकतात. तर दुसरीकडे या परुषांना डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करावे लागतील. तसेच या ड्रेसवर शूजदेखील घालावे लागणार आहेत.
संबंधित बातम्या