एक्स्प्लोर

Cannes Film Festival 2022 : मराठी सिनेमे जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यशस्वी होऊ, अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास

Cannes Film Festival 2022 : सध्या सर्वत्र 75 व्या कान्स फिल्म फेस्टिवलची धामधूम सुरू आहे.

Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला (Cannes Film Festival) आता सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक दिग्गज 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी लावत आहेत. मराठी सिनेक्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्‍वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये व्यक्त केला.

अमित देशमुख म्हणाले, मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच विविध देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून मानाचे स्थान मिळाले पाहिजे.  विविध देशांमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र शासनाचा विविध योजना राबविणाऱ्या मागील व्यापक दृष्टिकोन आहे. 

'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचे स्थान' या विषयावर झाले चर्चासत्र 

'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचे स्थान' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक  आणि अभ्यासक  अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक मनोज कदम तसेच फिल्म मार्केटसाठी निवड करण्यात आलेल्या  ' कारखानीसांची वारी ', ' तिचं शहर होणं ' आणि ' पोटरा ' या  मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अनुक्रमे अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, सिध्दार्थ मिश्रा, रसिका जोशी, समीर थोरात आणि शंकर धोत्रे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. 

'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'हे' कलाकार सहभागी

75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवणार आहे. तसेच हिना खान, पूजा हेगडे, आदिती राव हैजरी, नयनतारा आणि  ऐश्वर्या राय बच्चनदेखील रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने तो 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये सहभागी होऊ शकला नाही. 

संबंधित बातम्या

Cannes Film Festival 2022: सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जाणार कान्स चित्रपट महोत्सवात

Cannes 2022 : कान्सच्या रेड कार्पेटवर जाण्याआधी पूजा हेगडेसोबत घडलं असं काही...; ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?Eknath Shinde Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने-सामने, बैठकीत काय घडलं?Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंतPrashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Embed widget