वडिलांना सुई, धागा देऊन टेलर बनवायचं होतं, पण 'त्यानं' बॉलिवूडमध्ये नाव कमावलं; एवढंच काय तर, मुलीलाही स्टार केलं; ओळखलंत का कोण?
Bollywood Actor Struggle: वडील त्याच्या हातात सुई, धागा आणि मशीन देऊन त्याला टेलर बनवायचं स्वप्न पाहत होते. पण, त्याचं नशीब वेगळंच कापड विणत होतं. टेलर बनून इतरांचे कपडे शिवण्याऐवजी हा तरूण बॉलिवूडमध्ये आला आणि इथे आल्यानंतर क्राईम मास्टर गोगो झाला.
Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडमध्ये (Bollywood Actor) आपला ठसा उमटवणं सोपं नाही, पण ज्यांच्या नशीबात इथे चमकणं लिहिलंय, त्यांच्या आयुष्यात कितीही संकट येवोत, त्यांना नियती बरोबर त्यांच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फोटोमध्ये दिसणारा मुलाचं नशीब फळफळलं आणि तो थेट बॉलिवूडचा स्टार बनला. या लहानग्याचे वडील त्याच्या हातात सुई, धागा आणि मशीन देऊन त्याला टेलर बनवायचं स्वप्न पाहत होते. पण, त्याचं नशीब वेगळंच कापड विणत होतं. टेलर बनून इतरांचे कपडे शिवण्याऐवजी हा तरूण बॉलिवूडमध्ये आला आणि इथे आल्यानंतर क्राईम मास्टर गोगो झाला. आता तरी ओळखलं का? आम्ही कोणाबाबत बोलत आहोत. फोटोमध्ये निष्पाप दिसणारा हा बॉलिवूड स्टार नेमका आहे तरी कोण? याच विचारात आहात ना? फोटोत दिसणारा हा छोटासा स्टार दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा क्राईम मास्टर गोगो, प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर (Shakti Kapoor) आहेत.
आज शक्ती कपूर यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. सध्या त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. 1977 मध्ये 'खेल खिलाडी' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. आई-वडिलांनी त्यांचं नाव सुनील सुंदरलाल कपूर ठेवलं होतं. पण चित्रपटांच्या निमित्तानं त्यांनी नाव बदललं. कारण या नावाचे दोन चांगले स्टार्स इंडस्ट्रीत आधीपासूनच होते. शक्ती कपूर यांच्या वडिलांची नेहमी इच्छा होती की, त्यांनी टेलर व्हावं. पण शक्ती कपूर बॉलिवूडमध्ये आले आणि अभिनेते झाले. त्याच्या वडिलांना पोटापाण्यासाठी त्यांनी निवडलेला पर्याय अजिबात आवडला नाही. त्यांच्या आईला तर त्यांच्या खलनायकाच्या भूमिका पाहून राग अनावर व्हायचा. त्यांचा इन्सानियत का दुश्मन हा चित्रपट पाहिल्यानंतर आई चित्रपट सोडून थिएटरमधून निघून गेली. आईनं असं केल्यामुळे शक्ती कपूर संतापले.
शक्ती कपूर स्वतः चित्रपटसृष्टीत सक्रीय आहेत, त्यानंतर त्यांची मुलगीही सुपरस्टार झाली. शक्ती कपूर यांच्या लेकीसमोर बॉलिवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्री देखील फिक्या पडतात. शक्ती कपूर यांची लेक म्हणजे, अभिनेत्री श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूरनं 2010 मध्ये तीन पत्ती या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती, आशिकी 2 मधून. या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरला बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्डही मिळाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
"VIDEO लीक करेन..."; शाहरुख खानचा लेक आर्यन खान अनन्या पांडेला 'ब्लॅकमेल' करायचा, नेमकं घडलेलं काय?