एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा'ची हवा; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय?

Baipan Bhaari Deva Movie : 'बाईपण भारी देवा' या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मग ते सिनेमागृह असो वा महिला मंडळ गॉसिप गँग. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासोबत बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाने सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या 14 दिवसांत 36.78 कोटींची कमाई केली आहे. तगडी स्टारकास्ट, जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर दिवसेंदिवस या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये (Box Office Collection) वाढ होत आहे.

'बाईपण भारी देवा' हा सिनेमा यशस्वी होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Success Reasons)

- 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा चालण्याचं मुख्य कारण म्हणजे या सिनेमाची साधी सरळ गोष्ट. मेनोपॉज, घटस्फोट आणि नैराश्य अशा नाजूक विषयांवर हळुवार हात घालण्यात आला आहे. जया, शशी, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या सहा बहिणींची गोष्ट म्हणजे 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा होय.

- 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा प्रत्येक वयोगटातील महिला रिलेट करत आहे. त्यामुळे महिलावर्गाला हा सिनेमा भावला आहे.

- सिनेमातील, संवाद कलाकारांचा अभिनय, हटके पेहराव प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

- तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा. रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), दीपा परब (Deepa Parab) आणि सुकन्या मोने (Sukanya Mone) अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील दर्जेदार अभिनेत्री या सिनेमात आहेत. या प्रत्येकीचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.

- 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा चालण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सिनेमाचं मार्केटिंग. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली होती. तर सुपरस्टार अशोक सराफ यांनी या सिनेमाचा ट्रेलर आऊट केला होता.

- रिलीजआधीपासूनच या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये वेगवेगळे प्रयोग होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुलाखंतीसोबत सोशल मीडियाचा चांगला वापर या सिनेमाच्या टीमने केला आहे. 'आ जाओ दिखा दुंगा' असं म्हणत रिल्स करणाऱ्या प्रॉपर्टी गुरु भावेशच्या ट्रीकचा वापरही करण्यात आला.

- 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा टार्गेट ऑडियन्स हा महिलावर्ग आहे. भजनीमंडळ, महिला बचत गट, किटी पार्टी ग्रुप असे महिलांचे वेगवेगळे ग्रुप समुहाने जाऊन सिनेमा पाहण्याचा आनंद घेत आहेत.

- सिनेमा रिलीज झाल्यानंतरही कलाकारांची सिनेमा सोबतची नाळ जोडली गेली आहे. सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना भेटणं, त्यांचे अनुभव ऐकणं, वेगवेगळ्या मुलाखती देणं, प्रेक्षकांसोबत सिनेमातील गाण्यांवर डान्स करणं अशा अनेक गोष्टी या सिनेमातील अभिनेत्री करत आहेत.

- सिनेमा पाहाल्या जाताना महिला गॉगल लावून, नऊवारी साडी नेसून जात आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- 'बाईपण भारी देवा' या सिनेमाला टक्कर देणारा कोणताही मराठी-हिंदी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर नाही.

- 'बाईपण भारी देवा' या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. जुने शब्द आणि नवं म्युझिक प्रेक्षकांना आवडलं आहे.

- #बाईपणभारीदेवा हा हॅशटॅग सोशल मीडियावर 3.5 कोटींपेक्षा अधिक वेळा वापरला गेला आहे.

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...
अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Video: लग्नातील लाखोंच्या खर्चाला फाटा दिला अन् दोघांनी मिळून त्याच खर्चात नवा फ्लॅट घेतला अन् त्याच फ्लॅटमध्ये मोजक्या लोकांमध्ये लग्नाची गाठ बांधली!
Insta Girl Honeytrap: इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
इन्स्टावालीनं प्रेमानं बोलवताच भावड्याची कळी खुलली अन् गेला भेटायला; पुढच्या 15 तासात जे व्हायचं तेच झालं!
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
एकनाथ शिंदेंकडून कडक समज, संजय शिरसाठांची नाराजी दूर; संभाजीनगरमध्ये महापौर भाजप, उपमहापौरपदी शिवसेनेचा 'हा' नेता
अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...
अमरावतीत ट्विस्ट, भाजपला MIM च्या नगरसेवकाने दिलं मत, गटनेता बघतच राहिला; मीराबाई कांबळे म्हणाल्या...
Pakistan Attack: पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात मृत्यूचं तांडव; 31 ठार, 169 गंभीर जखमी; राजधानी इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
पाकिस्तानात शिया मशिदीत नमाज दरम्यान आत्मघाती हल्ल्यात मृत्यूचं तांडव; 31 ठार, 169 गंभीर जखमी; राजधानी इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, 31 मार्चपर्यंत पोर्टल सुरु, जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार?
जानेवारीच्या 1500 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, तारखा जाहीर
Parliament Budget Session: लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
लोकसभेत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरुच; कामकाज 9 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; फक्त 10 मिनिटे कामकाज
तुम्ही मेले की 10 दिवस... शेकापच्या जयंत पाटलांवर बोलताना रुपाली ठोंबरेंची जीभ घसरली; अंजली दमानियांना शूर्पणखेची उपमा
तुम्ही मेले की 10 दिवस... शेकापच्या जयंत पाटलांवर बोलताना रुपाली ठोंबरेंची जीभ घसरली; अंजली दमानियांना शूर्पणखेची उपमा
Embed widget