Shraddha Kapoor : 11 वर्षानंतर 'बॉयफ्रेंड'ला भेटली श्रद्धा कपूर, मुसळधार पावसात कडकडून मिठी; VIDEO व्हायरल
Aashiqui 2 : श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरची पावसात झालेल्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shraddha Kapoor-Aditya Roy Kapur Video : 'आशिकी 2' चित्रपटातील हिट जोडी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण, त्यांचा आशिकी 2 हा चित्रपट खूपच गाजला होता. त्या चित्रपटातील डायलॉग, गाणी आणि सीन्स आजही चाहत्यांचा डोळ्यासमोर उभे राहतात. जेव्हा-जेव्हा त्यांचे चाहते श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांना एकत्र पाहतात तेव्हा त्यांना 2013 मध्ये आलेल्या 'आशिकी 2' चित्रपटाची आठवण होते. आशिकी 2 चित्रपटातील आरोही आणि राहुलची लव्ह स्टोरी खूप प्रसिद्ध झाली होती.
11 वर्षानंतर एक्स बॉयफ्रेंडला भेटली श्रद्धा कपूर
आशिकी 2 हा रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपट चाहत्यांच्या मनात आजही घर करुन आहे. या चित्रपटातील त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीचं खूप कौतुक झालं होतं. आता अलीकडेच, या दोघांची हीच केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावर श्रद्धा आणि आदित्यच्या भेटीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा आणि आदित्यची जोडी पुन्हा एकदा दिसत आहे आणि यामुळे लोकांना 'आशिकी 2' चित्रपटातील आरोही आणि राहुलची आठवण झाली आहे.
मुसळधार पावसात कडकडून मिठी
श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य आणि श्रद्धा एकमेकांना मिठी मारतात आणि यावेळी जोरदार पाऊस सुरू आहे. हा सीन पाहून चाहत्यांना मोहित सूरीच्या 'आशिकी 2' चित्रपटाची आठवण झाली.
श्रद्धा-आदित्यचा व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
'आशिकी 2' चित्रपटातील एका दृश्यात, जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा आदित्यने आरोहीला रस्त्याच्या मधोमध जॅकेटने झाकलं होतं. त्यानंतर आता पुन्हा हे दोघे पावसात एकमेकांना मिठी मारताना दिसल्याने चाहत्यांना आशिकी 2 ची आठवण झाली आहे. श्रद्धा आदित्यचा हा व्हिडीओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूरने काळ्या रंगाची साडी नेसली आहे, आदित्यही ब्लॅक सूटमध्ये खूप स्मार्ट दिसत होता. चाहते या व्हिडीओवर एकामागून एक कमेंट करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :