(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aamir Khan : आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट, किंमत किती?
Aamir Khan Latest News : काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिषेक बच्चन याने मुंबईत गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" आमिर खान याने मुंबईत लक्झरी अपार्टमेंट खरेदी केला आहे.
Aamir Khan : अनेक बॉलिवूड कलाकार मालमत्ता खरेदी करून गुंतवणूक करत असतात. जमीन अथवा फ्लॅट, फार्म हाऊस खरेदी करून गुंतवणूक करत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने मुंबईत गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" आमिर खान (Aamir Khan) याने मुंबईत लक्झरी अपार्टमेंट खरेदी केला आहे.
'स्वेअर यार्डस् डॉट कॉम' या संकेतस्थळाने हे वृत्त दिले असून या व्यवहाराची कागदपत्रे असल्याचा दावा केला आहे. आमिर खानने मुंबईतील पाली हिल येथे हा लक्झरी अपार्टमेंट खरेदी केला असून त्याची किंमत 9.75 कोटी इतकी आहे.
हा लक्झरी अपार्टमेंट रेडी टू मुव्ह असून त्याचे क्षेत्रफळ 1027 चौरस फूट इतके आहे. या लक्झरी अपार्टमेंटच्या खरेदी व्यवहारावर 25 जून रोजी अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. आमिर खानने 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 58.5 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले. आमिरचे हे नवीन अपार्टमेंट पाली हिल परिसरात बेला विस्टा अपार्टमेंट्स नावाच्या एका अत्याधुनिक इमारतीत आहे.
आमिर खानची मालमत्ता किती?
आमिर खान जवळ आधीपासून बेला विस्ता अपार्टमेंट्स आणि मरिना अपार्टमेंट्स मध्ये आधीपासूनच स्थावर मालमत्ता आहे. त्याशिवाय, वांद्रे येथे समुद्र किनारी आलिशान दोन मजली घर आहे. वर्ष 2013 मध्ये आमिर खानने पाचगणी येथे 7 कोटी रुपयांमध्ये फार्म हाऊस खरेदी केले होते. जवळपास दोन एकर क्षेत्रफळ आहे.
View this post on Instagram
एकूण संपत्ती किती?
आमिर खानने काही व्यावसायिक संपत्तीमध्येही गुंतवणूक केली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे आमिर खानचे 22 घर आहेत. एका रिपोर्टनुसार, आमिर खानची संपत्ती ही 1892 कोटींच्या घरात आहे.
आमिरचे आगामी प्रोजेक्ट
आमिर खान सध्या आपल्या आगामी 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट येत्या डिसेंबर महिन्यात नाताळाच्या दरम्यान रिलीज होण्याची शक्यता आहे. याआधी 2022 मध्ये आमिर खानचा 'लाल सिंह चढ्ढा' रिलीज झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.