Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Wedding: वालावलकरांच्या चेडवाचो लग्न लागलो... कोकण हार्टेड गर्लचा शाही विवाहसोहळा संपन्न; प्रसिद्ध मंदिरात बांधली लग्नगाठ!
Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos: 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर लग्नबंधनात अडकली असून शाही विवाहसोहळ्याचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos : बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) लग्नाच्या बंधनात अडकली आहे. सध्या अंकिताच्या लग्नसोहळ्यासोबतच मेहंदी, हळद, संगीतचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. लग्नापूर्वीचे सगळे सोहळे विधीवत पार पडल्यानंतर अखेर अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत (Kunal Bhagat) यांचा विवाहसोहळा कोकणातील एका मंदिरात थाटामाटात पार पडला. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं तिच्या शाही सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
चाहत्यांसोबत लग्नाची गोड बातमी शेअर करताना अंकितानं एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. 'वालावलकरांचो थोरलो जावई' असं कॅप्शन देत, अंकितानं सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. अंकिता त्यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी असून तिला दोन धाकड्या बहिणी आहेत. त्यामुळेच अंकिताचा नवरा त्यांच्या घरातील थोरला जावई झाला. त्याचमुळे अंकितानं कुणालची ओळख खास पद्धतीनं करुन दिली आहे. अंकितानं इन्स्टाग्रामवर पुढे लिहिलं आहे की, "मी त्याची पत्नी झालेय, याकरता माझा नवरा कुणाल भगतचे खूप अभिनंदन... तो धन्य झालाय."
View this post on Instagram
अंकिता-कुणालचा शाही थाट
कोकण हार्टेड गर्लचा शाही विवाहसोहळा कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात पार पडला. पारंपरिक पद्धतीनं, थाटामाटात अंकिता आणि कुणाल लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांनी आपल्या लग्नासाठी खास लूक केल्याचं पाहायला मिळालं. अंकितानं लग्नासाठी खास पिवळ्या जरदोसी नक्षी असलेली सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, मुंडावळ्या, गळ्यात डिझायनर नेकलेस असा काहीसा लूक कोकण हार्टेड गर्लनं आपल्या लग्नासाठी केला होता. तर, कुणालनं लग्नासाठी मराठमोळा पेहराव केला होता. अंकितानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघांचा जोडा अगदी सुरेख दिसत आहे.
अंकिताचं लग्न नेमकं कुठे झालं?
कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर मुळची कोकणातील मालवणातली. तिनं तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवातही कोकणातूनच करण्याचं निश्चित केलं होतं. यापूर्वी अंकितानं नेमकं लोकेशन सांगितलं नव्हतं. पण, लग्नानंतर केलेल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये अंकितानं आपल्या लग्नाच्या ठिकाणाचा उल्लेख केला आहे. अंकिता-कुणाल यांचा शाही विवाहसोहळा कोकणातील प्रसिद्ध मंदिरात पार पडला. दोघांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावलमध्ये असणाऱ्या 'लक्ष्मीनारायण मंदिरा'त लग्नगाठ बांधली.
दरम्यान, काही महिन्यांपर्वी गाजलेल्या 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात अंकिता वालावलकर दिसून आलेली. यामुळे अंकिता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी'च्या घरातच अंकितानं फेब्रुवारीत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी अंकितानं कुणाल भगतसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासूनच चाहते कोकण हार्टेड गर्लच्या शाही विवाहसोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर अंकिता आणि कुणालनं आपली लग्नगाठ बांधली आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
