एक्स्प्लोर

राम शिंदेंना राजकारणातलं खूप कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करून त्यांना मुख्यमंत्री करा; रोहित पवारांचा पलटवार

राम शिंदे यांची जुनी सवय आहे की ते लगेच समोरच्या व्यक्तीवर आरोप करतात. त्यांना राजकारणातील जास्त कळत असेल तर देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करून यांना मुख्यमंत्री करा, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.  

मुंबई :  विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसला आहे. या निवडणुकीचा निकाल अविश्वसनीय आहे, असं विरोधक म्हणत आहेत. ही निवडणूक अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून लढवली होती. या तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी राज्यभरात एकदिलाने प्रचार केला होता. असे असले तरी भाजपचे नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी मात्र गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. माझ्याविरोधात कट शिजला, असा आरोप करून रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी प्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा आरोप करताना ते भावूक झाले होते. दरम्यान याच प्रकरणावर आता रोहित पवार (Rohit Pawar) यांची प्रतिक्रिया आली असून राम शिंदे (Ram Shinde) हे पराभवाच्या नैराश्यात असल्याने ते असे बोलताय. गुंड, सरकारी यंत्रणा, दडपशाही वापरूनही ते हरले म्हमून ते दुःखात आहेत असेही रोहित पवार म्हणाले. 

राम शिंदे यांची जुनी सवय आहे की ते लगेच समोरच्या व्यक्तीवर आरोप करतात. लोकसभेला विखे पाटील यांच्यावर केले होते आता अजित पवारांना दोषी धरताय. जर त्यांना वाटतं अजित पवारांनी महायुतीचे काम केलं नाही, तर मग त्यांनी तत्काळ देवेंद्र फडणवीस यांच्या कडे तक्रार करा. किंबहुना त्यांना राजकारणातील जास्त कळत असेल तर देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करा आणि राम शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे.  

राम शिंदे यांनी केलेले पाच मोठे दावे 

1) मला या सगळ्या गोष्टीची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या माहिती होती. आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर अजित पवार खरं बोलले. निवडणूक लागण्यापूर्वी त्यांचा एक कौटुंबिक करार झाला. कर्जत जामखेड मतदारसंघाबाबत एक कट रचला गेला. याच कटाचा मी बळी आहे. 

2) ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला, त्याच दिवशी रोहित पवार अर्ध्या रात्री अजित पवार यांच्याकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. माझ्याकडे ही खात्रीलायक माहिती आहे. आज या दोघांची समोरासमोर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली. 

3) अजित पवार यांच्या तोंडातून आज खरं बाहेर आलं. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर त्यांनी असं राजकारण केलं. ते वरिष्ठ नेते आहेत. महायुतीतील घटकपक्षाचे ते नेते आहेत. कटकारस्थान रचून त्यांनी हे काम केलेले आहे. त्यांच्याच तोंडून जेव्हा हे समोर आलं, तेव्हा मला या कटाची खरी परिचिती आलेली आहे. 

4) मी अजित पवार यांच्या वारंवार सभा मागितल्या होत्या. मी पक्षाकडे, नेतृत्त्वाकडे, दिल्लीचे प्रभारी यांच्याकडेही मी अजित पवार यांच्या सभा मागीतल्या होत्या. पण अजित पवार यांनी सभा दिल्या नाही. माझा समज होता की, अजित पवार यांचाही एक पक्ष आहे. इतर ठिकाणी अजित पवार यांची मागणी जास्त आहे, त्यामुळेच ते कर्जत जामखेड येथे आले नसावे. पण अजित पवार हे जाणीवपूर्क आलेले नाहीत, हे आज खरं ते समजलं आहे.

हेही वाचा :

लोकसभेत मुसंडी, विधानसभेत दाणादाण, महायुतीपुढे मविआ चारी मुंड्या चीत; दोन्ही निवडणुकीत कोण किती जागांवर जिंकलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 07 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTop 70 at 7AM Superfast 07 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
Happy Birthday Diljit : गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
Torres Scam Mumbai: रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?
रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?
Embed widget