लोकसभेत मुसंडी, विधानसभेत दाणादाण, महायुतीपुढे मविआ चारी मुंड्या चीत; दोन्ही निवडणुकीत कोण किती जागांवर जिंकलं?
राज्यात विधासभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत जनतेने महायुतीच्या पारड्यात मतांचं भरभरून दान दिलं आहे. विरोधकांनी मात्र या निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला आहे.
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात (Vidhan Sabha Election 2024 Result) महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळाले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला एकत्र मिळून 50 जागांचाही आकडा पार करता आलेला नाही. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र वेगळी स्थिती होती. त्या निवडणुकीत महायुतीची दाणादाण उडाली होती. तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारून महायुतीला चारीमुंड्या चीत केलं होतं. या निवडणुकीच्या सहा महिन्यांनी मात्र राज्यातील चित्र पूर्णपणे बदलल्याचं दिसलं. याच पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत नेमकी काय स्थिती होती? हे जाणून घेऊ या...
लोकसभेत कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?
एप्रिल ते जून या महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला होता. एकूण सात टप्प्यांत ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला होता. देशपाळीवरही भाजपाच्या जागा कमी झाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळाल्या?
महायुती- 18 जागा
महाविकास आघाडी- 30 जागा
भाजप
28 पैकी 9
स्ट्राईक रेट - 33.33 टक्के
-----
शिवसेना शिंदे गट
15 पैकी 7 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 46.30 टक्के
-----
राष्ट्रवादी (अजित पवार)
4 पैकी 1 जिंकली
स्ट्राईक रेट - 25 टक्के
----
ठाकरे गट
21 पैकी 9 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 42.85 टक्के
----
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
10 पैकी 8 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 80 टक्के
-----
काँग्रेस
17 पैकी 13 जिंकल्या
स्ट्राईक रेट - 76.47 टक्के
विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?
महायुती- 236
मविआ- 49
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने राज्यात राबवलेल्या काही योजना आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना यामुळे मतदांना महायुतीला भरभरून मतं दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत आलेल्या यशानंतर गाफील राहिल्याने महाविकास आघाडीला वधानसभा निवडणुकीत फटका बसला.
हेही वाचा :
ट्रम्पेटनं डाव साधला, शरद पवारांच्या पक्षाला तब्बल 9 जागांवर फटका; अनेक ठिकाणी 'सातारा' पॅटर्न!