Maharashtra Election 2024: धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही पिकाचा भाव सांगा, आमच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का नाही सांगा? रितेश देशमुखचं धडाकेबाज भाषण
Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेता रितेश देशमुखने धडाकेबाज भाषण केलं.

Ritesh Deshmukh, लातूर : "जो पक्ष तुम्हाला धर्म बचाव म्हणतो. धर्म धोक्यात आहे म्हणतो. खरं म्हणजे ते धर्माला प्रार्थना करत आहेत, आमचा पक्ष धोक्यात आहे. तुम्ही आम्हाला वाचवा. यांच्या भूल थापांना बळी पडण्याची गरज नाही. त्यांना म्हणा, धर्माचं आम्ही बघून घेतो. आमच्या कामाचं सांगा. धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही पिकाचा भाव सांगा. धर्माचा आम्ही बघून घेतो, तुम्ही आमच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का? ते सांगा" असं अभिनेता रितेश देशमुख म्हणाला. काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी त्याचे बंधू रितेश देशमुखने देखील हजेरी लावली. यावेळी तो बोलत होता.
रितेश देशमुख म्हणाला, ज्या व्यक्तीला लहानपणापासून मी धीरज म्हणायचो,तुमच्यामुळे धीरज भय्या म्हणावं लागतं. कालच्या महिला मेळाव्यात विजय निश्चितच झाला होता.आजची सभा ही लीड आहे. विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावे म्हणून येतात. लोकान सारखे आपल्याला काम करायचे आहे. आज आपले युवक लातूर पॅटर्नला शिक्षण घेत आहेत. यावेळी जोरात बटण दाबा...यावेळी झापुक झुपक वातावरण झाले आहे. समोर गुलिगत धोका आहे. विकासाचे कामाचे एकच नाव आहे धीरज देशमुख...ते तुमच्यासाठी काम करतात....भाषण काय करतात राव...अमित देशमुख एक नंबर...धीरज देशमुख एक नंबर...मी जेथे आहे तेथे ठीक आहे .....
पुढे बोलताना रितेश म्हणाला, आमच्या पिकाणा तुम्ही काय भाव देता ते सांगा..येणाऱ्या वीस तारखेला मतदान करा..अमित देशमुख यांच्याकडे मोठी जबाबदारी येणार आहे अशी चर्चा आहे. सरकार हे महाविकास आघाडीचे येणार आहे. तुमचा पंजा भारी ...आमचा पंजा भारी..सगळ्याचा पंजा लै भारी...आता दहा दिवस उरले आहेत...या दिवसात अफवा भूलथापा खूप येतील लक्ष ठेवा ..बूथवर काम करा...हे आपले काम आहे ... पाठीमागची लीड कशी क्रॉस करता येईल ते काम करू.
धीरज देशमुख म्हणाले, तुमच्या हाताला काम पाहिजे होते. शेतमालाला भाव पाहिजे. महिलांना सुरक्षितता हवी होती. मात्र त्यांनी ते केले नाही. तुमचे सरकार आहे. मात्र काहीच होत नाही. एकही खरेदी केंद्र सुरू नाही. तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही काहीच करत नाही.देशात 10 वर्ष ...राज्यात साडे सात वर्ष सरकार यांचे आहे मात्र उपयोग नाही. लोकसभेत आपण दाखवलं लातूर मध्ये काय होते.ते म्हणत होते ४५ पार...आपण म्हणालो बस कर यार....
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
