एक्स्प्लोर

Gujarat election result 2022: बुडत्याचा पाय खोलात, गुजरातमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळणं कठीण!

Gujarat election result 2022: गुजरात विधानसभेत 182 जागा आहेत. विरोधीपक्ष पदासाठी कमीतकमी 10 टक्के जागा निवडून येणं अनिवार्य आहे. विरोधीपक्ष नेतेपदासाठी गुजरातमध्ये कमीतकमी 18 जागा हव्या आहेत.

Gujarat election result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं (BJP) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये (gujrat) भाजपनं सलग सातव्यांदा सत्ता मिळवली आहे. या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसची (Congress) मात्र पुरती दाणादाण उडाली आहे. गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसनं 179 जागांवर उमेदवार दिले होते. पण काँग्रेसला दोन आकडी संख्याही अगदी जेमतेमच गाठता आली आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. मात्र एवढ्या दारूण पराभवामुळे आता काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही (Leader Of Opposition In Gujarat) मिळणं कठीण झालं आहे. केजरीवाल यांच्या आपमुळे काँग्रेसची मतं विभाजित झाल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलयं. पण याचा फटका काँग्रेसला मोठा बसला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला सात जागांवर विजय मिळला आहे तर 10 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. सकाळपासून गुजरातमध्ये भाजपच्या विजयाचे संकेत मिळायला लागल्यानंतर काँग्रेस कार्यालयात अक्षरशः शुकशुकाट दिसून आला. 

काँग्रेसचं विरोधीपक्ष नेते पदही जाणार-
गुजरात विधानसभेच्या 182 जागा आहेत. विरोधीपक्ष पदासाठी कमीतकमी 10 टक्के जागा निवडून येणं अनिवार्य आहे. विरोधीपक्ष नेतेपदासाठी गुजरातमध्ये कमीतकमी 18 जागा हव्या आहेत. पण सध्याच्या आकडेवारीवरुन काँग्रेसला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. पण या निवडणुकीत काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. काँग्रेसला तब्बल 50 जागांवर फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.  गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 27.3 टक्के मतं मिळाली आहेत. तर आप पक्षाला 12.9 टक्के मतं मिळाली आहेत. 

लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला विरोधीपक्ष नेते पद मिळालं नाही -
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची दाणादाण उडाली होती. 2014 मध्ये काँग्रेसचे देशभरात फक्त 44 खासदार निवडून आले होते तर 2019 मध्ये 52 खासदार निवडून आले होते. लोकसभेत विरोधीपक्ष नेते पदासाठी कमीतकमी 55 जागा निवडून येणं अनिवार्य आहे. पण काँग्रेसला दारुण पराभव सहन करावा लागल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही मिळालं नाही. मल्लिकाअर्जुन खर्गे यांना विरोधीपक्ष नेते करण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्न केले होते, मात्र लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. 

तेव्हा लोकसभेत काँग्रेसच्या विरोधात कुणीचं नव्हतं -
2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची स्थिती झाली तशीच 1980 आणि 1984 मध्ये विरोधीपक्षाची झाली होती. त्यावेळी काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला होता. 1980 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 531 पैकी तब्बल 353 जागांवर विजय मिळवला होता. दुसऱ्या क्रमांकावर जनता दल हा पक्ष होता, त्यांना 41 जागांवर विजय मिळवता आला होता. त्यावेळी एकाही पक्षाला विरोधीपक्ष नेते पद मिळालं नव्हतं.  1984 मध्ये 516 लोकसभा जागांपैकी काँग्रेसनं तब्बल 404 जागांवर विजय मिळवला होता तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या तेलगु देसम पार्टीला 30 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या तर जनता पार्टीला 10 जागा मिळाल्या होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget