एक्स्प्लोर

Amit Shah : सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबच्या मांडीवर बसणारी ठाकरे-पवारांची आघाडी; अमित शाहांची टीका

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Amit Shah, Nanded : "एकीकडे विकास करणारी नरेंद्र मोदींची महायुती आहे. तर दुसरीकडे सत्तेसाठी औरंगजेब फॅन क्लबच्या मांडीवर बसणारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी आहे. या दोघात तुम्हाला तुमचा  प्रतिनिधी निवडायचा आहे. यामध्ये सारखं क्रॅश होणारं राहुल बाबा नावाचं विमान देखील आहे", असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते उमरेड येथील सभेत बोलत होते. 

तुमची सेना आता उद्धव सेना झाली, खरी शिवसेना भाजपसोबत 

अमित शाह म्हणाले,  वर्धा नांदेड रेल्वे योजना या 5 वर्षात पूर्ण करणार आहोत. नदी जोड पारियोजना मध्ये पैनगंगा नदीचा समावेश करून सिंचन व्यवस्था वाढविणार आहोत. नागपूर मुंबई समृद्धी मार्ग उमरखेडला जोडण्याचे काम करणार आहोत. उद्धवजी ओरिजनल शिवसेना औरंगाबादचे नाव संभाजी नगर करण्यास विरोध करू शकत नाही. तुमची सेना आता उद्धव सेना झाली आहे. खरी शिवसेना भाजपसोबत आहे. 

राहुल बाबा आणि त्यांची पार्टी पुन्हा 370 कलम लागू करणार 

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, राहुल बाबा आणि त्यांची पार्टी पुन्हा 370 कलम लागू करणार आहे. काश्मीर भारतचा अभिन्न अंग आहे. काश्मीरला दुनियेची कुठलीही ताकत तोडू शकत नाही. मोदींनी प्रधानमंत्री बनल्यानंतर सेनेचे मनोबल वाढविले. आतंकवादी हल्ला होताच पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला.

महाविकास आघाडीवाले मशीदींना एक हजार कोटी रुपये देतील 

नाना पटोलेंना उलेमा भेटले. तुम्हाला वोट देऊ पण आमचे काम करा. मौलानाला प्रत्येक महिन्यात 15 हजार द्यावे लागतील. Sc, st, ओबीसीचे रिझर्वेशन समाप्त करून मुसलमानांना आरक्षण देणार आहेत. मशीदींना एक हजार कोटी रुपये देतील. उद्धव राम मंदिरात जात नाहीत, उलट मशीदींना एक हजार करोड देण्याची गोष्ट करतात, असंही शाह म्हणाले. 

सोनिया-मनमोहन सिंह यांचं सरकार होतं. आंतकवादी रोज भारतात हल्ले करत होते. हजारो लोकांना मारत होते. सोनिया आणि मनमोहन वोट बँकेच्या नादात आवाज काढत नव्हते. मोदीजींनी सैन्याचं मनोबल वाढवलं. मोदींच्या सरकार आल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला, असंही शाह यांनी सांगितलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : 'तर कोर्टात खेचेन', सुनील टिंगरेकडून शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget