Pune Crime Update: पाेलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालणं पडलं महागात, पुण्यात फरार दुचाकीस्वाराचा माज उतरवत ठोकल्या बेड्या
पुण्यातील फुरसुंगीच्या भेकराई नगर चौकात गुरुवारी ( 6 फेब्रुवारी ) सायंकाळी वाहतूक नियमन व कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यात दुचाकीस्वाराने दगड घातल्याची घटना घडली होती .

Pune Crime Update:गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात गुन्हेगारीन डोकं वर काढलंय .तोडफोडीच्या घटना वाढत असून किरकोळ कारणावरून मारहाण,धाकदपट,कोयता दाखवून दहशत वाजवण्याचा प्रकार वाढला आहे. दरम्यान , काही दिवसांपूर्वीच एका तरुणाने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात मारण्याचा प्रकार घडलेला असताना फोनवर बोलतो म्हणून पोलिसांनी रोखल्याचा राग मनात ठेवत थेट पोलिसांवर दगडाने हल्ला करणाऱ्या तरुणाला अखेर फुरसुंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .
आदिनाथ उर्फ बबलू भागवत मसाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्याने वाहतूक पोलिसांनी त्याला रोखले होते .याचा राग मनात धरून त्याने पोलिसांवर दगडाने हल्ला केला होता .
नेमके घडले काय होते ?
पुण्यातील फुरसुंगीच्या भेकराई नगर चौकात गुरुवारी ( 6 फेब्रुवारी ) सायंकाळी वाहतूक नियमन व कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यात दुचाकीस्वाराने दगड घातल्याची घटना घडली होती . वाहतूक पोलीस हवालदारावर दगड हल्ल्या केल्याने हा पोलीस कर्मचारी राजेश गणपत नाईक जखमी झाले होते .त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांचे प्रकृती आता स्थिर आहे .याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती .पोलीस हवालदार राजेश नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कार्यरत आहेत .गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी वर जाणाऱ्या व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता .फोनवर बोलू नको असे सांगून त्याची गाडी रोखण्याचा राग मनात धरत तरुणाने शिवीगाळ करत वात घातला .वाद इतका विकोपाला गेला की तरुणाने दुचाकी थांबवून रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून वाहतूक पोलिसाच्या डोक्यात घातला .हल्ला करून फरार झालेल्या दुचाकी चालकाला फुरसुंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला
पुण्यातील कोथरुड परीसरात एका तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुड परिसरातील आशिष गार्डन समोर तीन जणांकडून तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ला करुन हल्लेखोर फारार झाला आहे. राहुल जाधव असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, पुण्यातील खासगी रुग्णालयात तरुणावर उपचार सुरु आहेत.
कोथरुड परिसरातील आशिष गार्डन समोर राहुल जाधव या तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एकूण तीन जणांना हा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
