एक्स्प्लोर

Crime News: क्रुरतेचा कळस! जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची काढली धिंड, दोरखंडाने बांधलं, चटके दिले अन्..., मेळघाटातील घटना

Crime News: चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील 77 वर्षीय आदिवासी वृद्ध महिला नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता शौचास घराबाहेर पडली. तेव्हा तिच्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मेळघाट: मेळघाटात जादूटोण्याच्या (black magic) संशयावरून आदिवासी महिलेची धिंड आणि अन्य अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या (black magic) संशयावरून एका 77 वर्षीय आदिवासी महिलेची धिंड आणि अन्य अघोरी (black magic) प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संतापजनक घटना 30 डिसेंबरची असून तब्बल 18 दिवसांनी म्हणजेच काल 17 तारखेला समोर आली आहे. (Crime News)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथील 77 वर्षीय आदिवासी वृद्ध महिला नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता शौचास घराबाहेर पडली. तेव्हा या वृद्धेवर शेजाऱ्यांनी जादूटोण्याचा आळ घेत तिला दोरखंडाने बांधले. त्यानंतर वृध्द महिलेला मारहाण केली. त्यांनी तिला गरम सळाखीचे चटके दिले, मिरचीची धुरी दिली. तोंडाला काळे फासले एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही, तर त्या वृद्धेच्या डोक्यावर गाठोडे देऊन तिला मारहाण करत धिंड काढून तिला गावातून बेदखल केले. विशेष म्हणजे यात गावाचा पोलिस पाटील देखील सहभागी झाला होता. मन सुन्न करणारा आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारा हा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्याच्या रेट्याखेडा येथे 30 डिसेंबर रोजी घडला आहे. मात्र, तो 17 जानेवारीला उघडकीस आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पिडीत कुटुंबाने न्यायाच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पोलिसांत तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने राज्याचा महिला आयोग, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक आणि धारणी उपविभागीय अधिकारी यांना या तक्रारीची प्रत पाठविण्यात आली आहे. 

फलटणमध्ये ऊसाच्या शेतात आढळला धक्कादायक प्रकार

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एता गावामध्ये ऊसाच्या शेतात तोडणी सुरू असताना एका महिलेचा अर्थवट मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली, सुरा आढळून आल्यानं हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तसेच आसपासच्या परिसरात मिसिंगच्या केसेस आहेत त्यांच्या नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी देखील पोलीस बोलवत आहेत. सातारा पोलिसांपुढे महिलेच्या कमरेवर चा भाग शोधणे तसेच महिलेची ओळख पटवणे आणि आरोपींना शोधण्याचे मोठ आव्हान आहे. याचा छडा पोलीस कशा पद्धतीने लावणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याचा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येते. प्रदीप जाधव यांचं हे शेत गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे. लोकवस्ती पासून साधारण दीड किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे निर्मनुष्य अशा ठिकाणी हा खून झालेला आहे. महिलेच्या कमरेच्या खालचा भाग पोलिसांना सापडला आहे. परंतु कमरेच्या वरचा भागाचा पोलिस शोध घेत आहेत. प्रदीप जाधव या शेतकऱ्याच हे उसाचं शेत आहे. उसाची तोडणी सुरू असताना हा सर्व प्रकार समोर आला आहे. आता सातारा पोलिसांपुढे मोठे आव्हान असणार आहे. या अज्ञात महिलेचा शोध घेतला जात आहे. जितक्या मिसिंग केस आहेत त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर या महिलेची ओळख पटवणे देखील सुरू आहे, मात्र अद्याप याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harish Daroda : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याला जेलमध्ये हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जीव सोडला, भात खरेदी घोटाळा प्रकरणात झाली होती अटक
अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याला जेलमध्ये हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जीव सोडला, भात खरेदी घोटाळा प्रकरणात झाली होती अटक
स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत, मुख्यमंत्री म्हणून सर्वच खात्याचे प्रमुख असताना गृह खातं स्वत:कडे का ठेवता? सतेज पाटलांचा फडणवीसांवर प्रहार
स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत, मुख्यमंत्री म्हणून सर्वच खात्याचे प्रमुख असताना गृह खातं स्वत:कडे का ठेवता? सतेज पाटलांचा फडणवीसांवर प्रहार
Mira Bhayandar Mahanagarpalika Mayor : मिरा भाईंदर महापालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, इतर भाषिक बसल्यास रक्त सांडेल, मराठी एकीकरण समितीचा गंभीर इशारा
मिरा भाईंदर महापालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, इतर भाषिक बसल्यास रक्त सांडेल, मराठी एकीकरण समितीचा गंभीर इशारा
BJP on Raj Thackeray Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या जयंतीदिनी भाजपने ठाकरे बंधूंना डिवचणारा बॅनर लावला, 'मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला...'
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी भाजपने ठाकरे बंधूंना डिवचणारा बॅनर लावला, 'मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला...'

व्हिडीओ

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं, शाळेच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Ishwar Tayade On Sarita Mhaske : सरिता म्हस्के लक्ष्मी दर्शनासाठी २ दिवस गायब होत्या, तायडेंची टीका
Nagpur BJP Banner : भाजपने राज्यभर लावलेल्या एका होर्डिंगची मोठी चर्चा
Vikas Gogawale Arrested : विकास गोगावले अखेर महाड पोलिसांना शरण
Badlapur Crime News :  लैंगिक शोषणाच्या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरलं, मोठी माहिती समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harish Daroda : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याला जेलमध्ये हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जीव सोडला, भात खरेदी घोटाळा प्रकरणात झाली होती अटक
अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याला जेलमध्ये हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जीव सोडला, भात खरेदी घोटाळा प्रकरणात झाली होती अटक
स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत, मुख्यमंत्री म्हणून सर्वच खात्याचे प्रमुख असताना गृह खातं स्वत:कडे का ठेवता? सतेज पाटलांचा फडणवीसांवर प्रहार
स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत, मुख्यमंत्री म्हणून सर्वच खात्याचे प्रमुख असताना गृह खातं स्वत:कडे का ठेवता? सतेज पाटलांचा फडणवीसांवर प्रहार
Mira Bhayandar Mahanagarpalika Mayor : मिरा भाईंदर महापालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, इतर भाषिक बसल्यास रक्त सांडेल, मराठी एकीकरण समितीचा गंभीर इशारा
मिरा भाईंदर महापालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, इतर भाषिक बसल्यास रक्त सांडेल, मराठी एकीकरण समितीचा गंभीर इशारा
BJP on Raj Thackeray Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या जयंतीदिनी भाजपने ठाकरे बंधूंना डिवचणारा बॅनर लावला, 'मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला...'
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी भाजपने ठाकरे बंधूंना डिवचणारा बॅनर लावला, 'मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला...'
Badlapur crime news: नराधमाला पाहताच चिमुरडी भेदरुन आई-बाबांच्या मागे लपली, बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार, नेमकं काय घडलं?
नराधमाला पाहताच चिमुरडी भेदरुन आई-बाबांच्या मागे लपली, बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचार, नेमकं काय घडलं?
Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिराची सजावट, पाहा PHOTOS
विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिराची सजावट, पाहा PHOTOS
Badlapur Shiv Sena vs BJP: बदलापूरमध्ये सत्ताधाऱ्यांमधील वाद विकोपाला, शिंदे गटाच्या नगरसेवकाला भाजप पदाधिकाऱ्याकडून बेदम मारहाण, नेमकं प्रकरण काय?
बदलापूरमध्ये सत्ताधाऱ्यांमधील वाद विकोपाला, शिंदे गटाच्या नगरसेवकाला भाजप पदाधिकाऱ्याकडून बेदम मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Raj Thackeray: आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी... राज ठाकरेंच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी... राज ठाकरेंच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Embed widget