एक्स्प्लोर

Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल

Cyber Crime : गेल्या वर्षी सायबर क्राईमच्या माध्यमातून 10 हजार कोटींहून अधिक रक्कमेचा गंडा घालण्यात आला होता. आता त्यावर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सिम ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) आणि सायबर गुन्हे (Cyber Crime) सरकारसाठी चिंतेचा विषय बनला असून त्यांच्यावर आता केंद्र सरकारकडून मोठी कारवाई होणार आहे. देशात 18 लाखांहून अधिक संशयास्पद सिम बंद होणार आहेत. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्या सरकारला सहकार्य करणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी अशा संशयास्पद सिमची या आधीच तपासणी केली होती. या सिमकार्डच्या मदतीने अनेक प्रकारचे आर्थिक गुन्हे केले जात असल्याचे आढळून आले.

एकाच मोबाईलमध्ये हजारो सिम वापरल्या गेले

इकॉनॉमिक टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, तपासादरम्यान अशा प्रत्येक मोबाईलमध्ये हजारो सिमकार्ड वापरले जात असल्याचे आढळून आले. दूरसंचार विभागाने 9 मे रोजी कंपन्यांना आदेश दिले होते की, 28,220 मोबाईल फोन आणि सुमारे 20 लाख सिमकार्डचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यापैकी 18 लाख सिम आणि हजारो मोबाईल फोन प्रभावित होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मोबाईल फोन आणि सिमकार्डच्या मदतीने अलीकडच्या काळात अनेक मोठे आर्थिक गुन्हे घडले आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत ही कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

2023 मध्ये 10,319 कोटी रुपयांचा गंडा

नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) नुसार, 2023 मध्ये सायबर गुन्ह्यातील पीडितांना सुमारे 10,319 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संसदेच्या एका समितीने सांगितले होते की, 2023 मध्ये आर्थिक गुन्ह्यांच्या सुमारे 6.94 लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी आणि टेलिकॉम कंपन्या टाळण्यासाठी, फसवणूक करणारे भामटे हे इतर टेलिकॉम सर्कलमध्ये जातात आणि सिम कार्ड वापरतात. तसेच एकाच फोनमध्ये अनेक सिम बदलत राहतात. हे लोक काही कॉल केल्यानंतरच सिम बदलतात.

गेल्या वर्षी 2 लाख सिम बंद करण्यात आले

गेल्या वर्षीही टेलिकॉम कंपन्यांनी सायबर गुन्ह्यांशी संबंधित 2 लाखांहून अधिक सिम बंद केले होते. यानंतर हरियाणातील मेवातमध्ये जवळपास 37 हजार संशयास्पद सिम ब्लॉक करण्यात आले. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना वेळोवेळी संशयास्पद सिमवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Accident : नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
Pandharpur Vitthal Mandir: लाखो विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित प्रकाशित 
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित, वादावर पडदा
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChitra Wagh on Anil Parab :  माझ्या चारित्र्यावर किती वेळा बोलणार, आम्ही काय रस्त्यावर पडलो आहे का?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 22 मार्च 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Accident : नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
नातेवाईकांकडील कार्यक्रमानंतर घरी परतताना काळाचा घाला, दोन कार धडकून भीषण अपघात, दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी
Pandharpur Vitthal Mandir: लाखो विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित प्रकाशित 
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! विठ्ठल मंदिर टोकन दर्शन अन् स्काय वॉकच्या रद्द केलेली निविदा पुन्हा प्रकाशित, वादावर पडदा
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
जामिनासाठी बिनधास्त फिरणारा 'चिल्लर' प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलाच नाही, आता दुबईला फरार झाल्याची चर्चा; अमोल मिटकरींचा घरचा आहेर, सुषमा अंधारेंनी सुद्धा घेरलं
Ajit Pawar Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
औरंगजेबाच्या कबरीवरुन आक्रमकपणा दाखवणाऱ्यांना अजितदादांनी सुनावलं, नितेश राणेंचे कान टोचले, म्हणाले...
Pune Hinjwadi Bus Fire: 'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
'बघतोच एकेएकाची वाट लावतो!', बस पेटवून देण्याआधी चालकाने दिलेली धमकी, पोलिस तपासात माहिती आली समोर
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत रंगत, कृष्णाकाठावर विरोधकांमध्ये दुफळी, तिरंगी लढत, बाळासाहेब पाटील पुन्हा बाजी मारणार? 
सह्याद्री साखर कारखान्यात तिरंगी लढत, विरोधकांची बोलणी फिस्कटली, निवडणुकीत कोण बाजी मारणार?
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
काहींच्या तोंडाची गटारंगगा उघडली की घाणच बाहेर निघते, तसंच या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे, माझ्यावेळी 1760 चा आकडा सांगितला, मेहबुब शेख याची चित्रा वाघांवर बोचरी टीका
Sangli Crime : जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
जन्मदाता बाप की नराधम! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत काही महिन्यापासून नको ते कृत्य, वैतागलेल्या आईची पोलिसांकडे धाव, सांगलीतील घटनेने संताप
Embed widget