Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Kalyan Crime News : मित्राला लॅपटॉप देण्यासाठी अंधेरीवरून कल्याणमध्ये आलेल्या तरुणीवर लोकग्रामच्या मोटरसायकल पार्किंगमध्येच ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ठाणे : यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला लुटण्याचा प्रकार घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीच्या जवळची लॅपटॉपची बॅग घेऊन हल्लेखोर पसार झाले आहेत. या हल्ल्यात टाकण्यात आलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे तरुणी जखमी झाली असून तिच्या अंगावरचे कपडे जळाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
कल्याणच्या लोकग्राममध्ये राहणाऱ्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी अंधेरीवरून आलेल्या तरुणीवर लोकग्रामच्या मोटरसायकल पार्किंगमध्येच ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला. तिच्या जवळील लॅपटॉप लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.
या तरुणीच्या अंगावर कास्टिक सोडा टाकण्यात आला. तरूणीला यामुळे कोणतीही गंभीर इजा जरी झाली नसली तरी तिची ओढणी आणि कपडे मात्र ज्वलनशील पदार्थामुळे जळाले. कल्याण पूर्वेतील लोकग्राम पार्किंग प्रभाग परिसरात ही घटना घडली. या तरूणीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पती-पत्नीचे भांडण सोडवण्यास गेलेल्या दोघांची हत्या
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पती-पत्नीच्या वादात मध्यस्ती करायला गेलेल्या दोन व्यक्तींची हत्या झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये (Dombivli Crime) घडली आहे. एका प्रकरणात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या प्रकरणात भावजयीने दिराची हत्या करून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका घटनेत पती-पत्नीचा वाद सुरू असताना शेजारी राहणारा व्यक्ती मध्यस्थी करण्यास गेला. त्यानंतर त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे भाऊजयी आणि भावाचं भांडण सुरू असताना मध्यस्थी करायला गेलेल्या दिराची भाऊजयीने हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर भाऊजयीने हाताची नस कापून घेतली आहे.
ही बातमी वाचा: