Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Zilla Parishad Election : भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या 62 वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाचं कविता उईके यांच्या रूपाने अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) उमेदवाराची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Bhandar Zilla Parishad Election : भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज (27 जानेवारी) पार पडली. भंडारा जिल्हा परिषदेची 1962 मध्ये स्थापना झाली. दरम्यान, भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या 62 वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाचं अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) उमेदवाराची अध्यक्षपदी निवड (Maharashtra Politics) झाली. जिल्हा परिषदेतून निवडून आलेल्या काँग्रेसच्या (Congress) कविता उईके या आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत.
आदिवासी बांधवांनी या विजयाचा जल्लोष जिल्हा परिषदसमो साजरा केलाय. यावेळी पिवळं वस्त्र परिधान करून आलेल्या महिला आणि आदिवासी बांधवांनी गोंडी ढेमसा आणि डीजेच्या तालावर नृत्य केलं. भंडारा जिल्हा परिषदवर पहिल्यांदाचं आदिवासी समाजातील महिलेची अध्यक्षपदी वर्णी लागल्यानं जिल्हा परिषदसमोर आदिवासी बांधवांचा जल्लोष बघायला मिळाला.
भंडाऱ्यात काँग्रेसचा अध्यक्ष तर, महायुतीचा उपाध्यक्ष
भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणुक आज (27 जानेवारी) पार पडली. भाजपकडून अध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या भाजपच्या माहेश्वरी नेवारे यांचं जात वैधता पडताळणी समितीनं सभासदत्व रद्द केल्यानं अध्यक्षपदाची माळ काँग्रेसच्या कविता उईके यांच्या गळ्यात पडली. काँग्रेसच्या कविता उईके या बिनविरोध निवडून आल्यात. तर, उपाध्यक्षपद हे महायुतीनं आपल्याकडं खेचून आणलं. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ फेंडर हे निवडून आलेत. एकनाथ फेंडर यांनी काँग्रेसचे देवा इलमे यांचा 7 मतांनी पराभव केला.
एकनाथ फेंडर यांना 30 तर, देवा इलमे यांना 21 मतं मिळाली. काँग्रेसचे 21 सदस्य असून बहुमताचा 26 चा आकडा पार करता आला नाही. त्यामुळं काँग्रेसचं उपाध्यक्षपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भंडारा जिल्हा परिषद संख्याबळ
काँग्रेस - 21
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार - 13
भाजप - 12
शिवसेना - 01
बीएसपी - 01
अपक्ष - 04
चंद्रपूर बँक घोटाळ्यासंबंधी दोषीवर कारवाई करण्यास सांगणार - मंत्री अशोक उईके
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या मध्यवर्ती बँकेने केलेला घोटाळा चव्हाट्यावर आणण्यासाठी 16 जानेवारीपासून उपोषण सुरू करण्यात आलं. परंतु त्या उपोषणकर्त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेले नाही. यावर बोलताना चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले की, "गेल्या अनेक दिवसापासून मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे आणि ते आंदोलनावर बसले आहेत. याविषयी मी त्यांना कारवाई करण्याचे आश्वासित केलं आहे. उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आहे आणि याबाबत मुख्यमंत्र्यांना मी अवगत करून त्याची चौकशी करावी, अशी विनंती करणार" असल्याचे त्यांनी गोंदिया येथे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या