एक्स्प्लोर

Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता

अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील का, असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारण्यात आला होता.

मुंबई: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सातत्याने पाठपुरावा करुन देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करणाऱ्या, व आरोपींच्या अटकेसाठी सरकारवर दबाव टाकणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी समाधान व्यक्त केलं असून 25 ते 30 मिनिटे दोघांमध्ये बीड व धनंजय मुंडेंसंदर्भात (Dhananjay munde) चर्चा झाली आहे. आमच्या दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. उद्या दुपारी 12 वाजता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, मी जे पुरावे त्यांना दाखवले, कागदपत्रे दिली, त्या अनुषंगाने ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडलं ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे त्यांचेही म्हणणे आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते धनजंय मुंडेंचा राजीनामा घेतील, असा विश्वास अंजली दमानिया (Anjali damania) यांनी व्यक्त केला.

अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील का, असा प्रश्न अंजली दमानिया यांना विचारण्यात आला होता. त्यावर, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्याकडील बीडमधील दहशतीचे सगळे पुरावे, रील्स हे सगळं बघून घेतलं, समजून घेतलं, जे त्यांना आत्तापर्यंत माहिती नव्हतं. आज गंभीरपणे त्यांनी सगळं बघितलंय, त्यामुळे ते नक्कीच राजीनाम्याबाबत विचार करतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटलं. तसेच, जर त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यास ते योग्य होणार, असेही अंजली दमानिया यांनी म्हटलं.

मी बॅलन्सशी कंपनीच्या दिल्या आहेत. महाजनकोकडून आर्थिक नफा घेत असून राजश्री मुंडे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे सरळसरळ आर्थिक फायदे आहेत, हे दिसून येत आहे. गृहमंत्रालयाने मंत्री व आमदारांसाठी जे डायरेक्शन दिले आहेत, तेही मी अजित पवारांना दाखवले. त्यामुळे, हे सगळं गंभीर आहे असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे, ते मंत्रिपदाबाबत निर्णय घेतील. मात्र, राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यास मी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे सुमोटो दाखल करुन संबंधित आमदाराची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचंही अंजली दामानिया यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे, तरीही मी आज त्यांची भेट घेऊन बीडमधील दहशत आणि लोकप्रतिनीधींकडून होणाऱ्या गैरव्यवहार व गैरकृत्याची माहिती दिली. त्यांनी देखील माझं म्हणणं व्यवस्थीत ऐकून घेत गंभीरतेने दखल घेतल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा

सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Guardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोपABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Embed widget