(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोंबिवलीत भररस्त्यात महिलेची छेडछाड, रोड रोमियोला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Dombivli Crime News : डोंबिवलीत रोड रोमियोने भररस्त्यात महिलेची छेडछाड काढल्याचा धक्कादायक प्रकार (Crime News) समोर आलाय.
Dombivli Crime News : डोंबिवलीत रोड रोमियोने भररस्त्यात महिलेची छेडछाड काढल्याचा धक्कादायक प्रकार (Crime News) समोर आलाय. येथील आजदेपाडामध्ये भर रस्त्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. रात्री अकराच्या सुमारास घटना घडली होती. यावेळी स्थानिक तरुणांनी रोड रोमियोला चोप दिला. याप्रकरणी मानपाडा पोलिसांत (News on manpada police in Marathi) गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर पोलिसांनी (Police) तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रितम सुनिल गायकवाड असे रोड रोमियोचे नाव आहे. कामावरून घरी परतत असताना महिलेचा पाठलाग करत छेडछाड केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
डोंबिवली पूर्वेत राहणारी पीडित महिला मुंबईत एका खासगी कंपनीमध्ये कामासाठी जाते. नेहमीप्रमाणे डोंबिवली स्टेशनवरून ती कल्याण डोंबिवली मनपा परिवहन मंडळाच्या बसने डोंबिवलीतील घारडा सर्कलला उतरून पायी घराकडे जात होती. त्यावेळी या महिलेचा पाठलाग करत रोड रोमियो प्रितम सुनिल गायकवाड याने भररस्त्यात महिलेचा गळा दाबत त्याने तिच्याशी लगट करण्यास सुरुवात केली. महिलेने जोर जोरात किंचाळी फोडली. या महिलेची किंचाळी ऐकताच बाजूच्या बंगल्यात क्रिकेट खेळत असलेले तरुण बाहेर आले.
या तरुणांना पाहून प्रीतम गायकवाड याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण तरुणांनी फिल्मी स्टाईलने त्याचा पाठलाग करत त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रीतमला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतम गायकवाड हा अंधेरी मरोळ येथे राहणारा असून तो डोंबिवलीत त्याच्या नातेवाईकाकडे आला होता.
अल्पवयीन मुलीवर संचालकाचा अत्याचार, पिंपरीत घडली धक्कादायक घटना
गुंड गणेश मारणे अन् विठ्ठल शेलार यांच्यापासून जिवाला धोका, शरद मोहोळच्या पत्नीचा दावा
3 राज्यात गुंगारा दिला, संगमनेरजवळ पोलिसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या, गुंड गणेश मारणे कसा पकडला?