Naxal : माओवादी संघटनेला मोठा हादरा, 35 पेक्षा अधिक गुन्हे, चाळीस लाखांचे बक्षीस असलेला माओवाद्यांचा बडा नेता जेरबंद
Gadchiroli Naxal News : छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगाना या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात दहशत असलेल्या माओवाद्यांचा (Naxal) बडा नेता विकासला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे.
Gadchiroli Naxal गडचिरोली : गडचिरोलीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यात जिल्ह्यातल्या दक्षिण भागातल्या तीन तालुक्यांसह छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगाना या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात दहशत असलेल्या माओवाद्यांचा (Naxal) बडा नेता विकासला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. विकास हा गडचिरोली जिल्ह्यातल्या (Gadchiroli Naxal) विभागीय समितीचा सदस्य असून तो अहेरी दलमचा प्रभार सांभाळणारा मोठा माओवादी नेताही आहे.
त्याच्यावर तीन राज्यातले 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करण्याच्या चकमकीच्या 11 गुन्ह्यासह दोन पोलिसांसह पाच जणांच्या हत्येच्या, दरोड्याचे आणि जाळपोळीचे असे 22 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे माओवाद्यांचा बडा नेता पोलिसांचा हाती लागल्याने नक्षलविरोधी कारवाईला मोठे यश आल्याचे बोलले जात आहे. तर त्याच्या अटकेने दक्षिण गडचिरोलीतल्या माओवादी संघटनेला मोठा हादराही बसला आहे.
अनेक मोठ्या हिंसक घटनांचा सूत्रधार, चाळीस लाख रुपये बक्षीस
मिळालेल्या माहितीनुसार, विकास हा गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी, सिरोंचा,भामरागड या तीन तालुक्यातल्या शंभर किलोमीटर परिसरातल्या माओवादी कारवायांचा सूत्रधार होता. माओवाद्यांच्या अनेक मोठ्या हिंसक घटनांचा सूत्रधार असलेला विकास घटना घडवून छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कच्या अभयारण्यात वास्तव्याला जायचा. त्याच्यावर चाळीस लाख रुपये बक्षीस असून तो मधल्याकाळात आजारी असल्याने उपचारासाठी जगदलपूरला जात होता. दरम्यान, बिजापूर पोलिसांनी माहितीच्या आधारे सापळा रचला आणि त्याला अटक केली आहे. त्याच्या अटकेने दक्षिण गडचिरोलीतल्या माओवादी संघटनेला मात्र मोठा हादरा बसला असल्याचे बोलले जात आहे.
तरुणाकडून शालेय विद्यार्थिनीची छेडछाड
बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल गावात एका तरुणाने एका शालेय विद्यार्थिनीची छेडछाड करत या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिलीय. याप्रकरणी तामगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ या तरुणाला अटक करून त्याच्यावर विनयभंग व पोस्को नुसार गुन्हे दाखल केले आहेत. ही माहिती इतर गावात पसरतात वरवट बकाल येथे तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यावर नियंत्रण मिळवलंय. तर तात्काळ हिंदुत्ववादी संघटनांनी वरवट बकाल बंदचा आज आवाहन केल आहे, त्यानुसार वरवट बकाल येथे कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून गावात शांतता आहे.
हे ही वाचा