Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोले
Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोले
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी झाला. यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून पहिले हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी परभणी आणि बीडच्या प्रकरणावर सरकारवर निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत परभणी राडा आणि बीडच्या घटनेवर भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी परभणी रेल्वे स्थानकाबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका मनोरुग्णाने केली होती. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले होते. यातील सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. तर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आले. या घटनेचे पडसाद बीडमध्ये उमटले. या दोन्ही प्रकरणावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली.
सरकारने भूमिका मांडावी : नाना पटोले
नाना पटोले म्हणाले की, परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या सरकार अस्तित्वात आल्यानंतर घडल्या आहेत. काल परभणीमध्ये आंबेडकरी विचारांची चळवळ लढणारा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला, असे त्यांनी म्हटले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात सदन प्रस्ताव आणि सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या संदर्भातला निर्णय मी देईल. मी निर्णय दिल्यानंतर आपण यावर बोलू, असे म्हटले. यानंतर नाना पटोले म्हणाले की, सरकार अस्तित्वात आल्यानंतर या घटना घडलेल्या आहेत. आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेमुळे पूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. विधानसभा अध्यक्ष आपल्या माध्यमातूनच आम्हाला न्याय मिळू शकतो. राज्यातील जनतेला न्याय मिळू शकतो. सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे राज्यात लोकांमध्ये तीव्र चिड निर्माण झाली आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे सरकारने त्यांची भूमिका मांडावी, असे त्यांनी यावेळी म्हटले.