देशातील सर्वात मोठे 62 फूट उंच माओवादी स्मारक पोलिसांकडून उध्वस्त; छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोठी कारवाई
छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यात पोलीस दलाने नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. बिजापूर मध्ये माओवाद्यांनी उभारलेल्या 62 फूट उंच नक्षल स्मारकाला उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
Gadchiroli Naxal गडचिरोली : छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यात पोलीस दलाने नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. बिजापूर मध्ये माओवाद्यांनी उभारलेल्या 62 फूट उंच नक्षल स्मारकाला उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे स्मारक देशातील सर्वात मोठे स्मारक असल्याची माहिती आहे. माओवादी संघटनेकडून पोलीस चकमकीत किंवा अन्य कारणाने मारले गेलेल्या माओवाद्यांच्या स्मरणात असे स्मारक उभारले जात असतात. मात्र हे स्मारक देशातील सर्वात मोठे स्मारक असून त्याला उध्वस्त करण्यासाठी स्फोटकाचा वापर करण्यात आले आहे. देशात माओवाद खत्म करण्यासाठी त्या प्रकारे पावलं उचलली जात आहे. त्याचेच हे एक उदाहरण आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे सर्व स्थरातून कौतुक केलं जात आहे.
राज्यात एकही नव्या नक्षलवाद्यांच्या दलममध्ये प्रवेश नाही
गेल्या पाच वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील एकही स्थानिक तरुणाने नक्षलवाद्यांच्या दलम मध्ये प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे गडचिरोली किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या नक्षलवाद्यांच्या हिंसात्मक कारवाया फक्त परराज्यातील नक्षलवाद्यांच्या जोरावर केल्या जात आहे, आणि हे आम्ही म्हणत नाही. तर हा गौप्यस्फोट केला आहे गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा नेतृत्व करणाऱ्या, त्यांचा सरसेनापती मानल्या जाणाऱ्या "कोला तुमरेटी उर्फ नांगसू उर्फ गिरधर" ने.
गेले अनेक वर्ष गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या सशस्त्र लढ्याचा नेतृत्व करणाऱ्या गिरधरने काही दिवसांपूर्वी पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बोलताना नक्षलवाद्यांच्या या टॉप कमांडर गिरधरने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.
गडचिरोली आणि महाराष्ट्रात नक्षलवाद्यांची कंबर अक्षरशः तुटली आहे. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करणे बंद केले आहे. स्थानिक तरुणांना आता बंदुकी पेक्षा विकास प्रकल्प आणि त्याच्यातून निर्माण होणारे रोजगार आकर्षित करत आहे. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात आम्ही एकही स्थानिक तरुणाला नक्षल दलम मध्ये रुजू (recruit)करू शकलो नसल्याची कबुलीच गिरधरने दिली आहे. बंदुकीचा मार्ग चुकीचा असून गोरगरिबांचे रक्षण फक्त संविधानच करू शकतो, त्यामुळे संविधानाचा मार्गच योग्य आहे, अशी प्रांजळ कबुली ही नक्षलवाद्यांच्या कधी काळच्या या टॉप कमांडर ने एबीपी माझा शी बोलताना दिली आहे.
कोण आहे गिरधर?
-पूर्ण नाव - कोला तुमरेटी उर्फ गिरधर..
-गिरधर ने वयाच्या 16 व्या वर्षापासून जीवनाचे तब्बल 28 वर्ष नक्षलवाद्यांसोबत जंगलात काढले.
-गिरधर गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या सशस्त्र लढ्याचा कमांडर तर होताच, सोबतच तो नक्षलवाद्यांच्या राजकीय व सामाजिक प्रपोगंडा मधील महत्त्वाचा थिंक टॅंकही होता. (म्हणजेच तो जंगलमधील गोरिल्ला वॉर आणि राजकीय प्रपोगंडा दोन्ही गोष्टी हाताळत होता)
-काही आठवड्यांपूर्वी गिरधरने तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.
हे ही वाचा