भारतात तुला चांगली नोकरी लावतो, फसवणूक बांगलादेशी तरुणी वेश्या व्यवसायात; डोंबिवलीत सर्वात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
बांग्लादेशमधून मुलींना आणून वेश्याव्यवसाय ढकलणारा दलालांचा म्होरक्या युनूस शेख उर्फ राणाला देखील अटक करण्यात आली आहे.
![भारतात तुला चांगली नोकरी लावतो, फसवणूक बांगलादेशी तरुणी वेश्या व्यवसायात; डोंबिवलीत सर्वात मोठं रॅकेट उद्ध्वस्त Dombivli Crime news Cheating Bangladeshi girls into prostitution Biggest racket busted in Dombivli भारतात तुला चांगली नोकरी लावतो, फसवणूक बांगलादेशी तरुणी वेश्या व्यवसायात; डोंबिवलीत सर्वात मोठं रॅकेट उद्ध्वस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/a316917f698a4b8671e77ff839620d53169684387794789_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: कुणाला उपचार तर कुणाला नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसायात (Prostitution) ढकलणाऱ्या पाच दलालाना अटक करत सात मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. फ्रीडम फर्म या संस्थेच्या मदतीने ठाणे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग (Human trafficking) सेल आणि मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे बांग्लादेशमधून मुलींना आणून वेश्याव्यवसाय ढकलणारा दलालांचा म्होरक्या युनूस शेख उर्फ राणाला देखील अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील फ्रीडम फर्म ही संस्था महिला व मुलीची देह व्यापारातून सुटका करत त्यांचे पुनर्वसन करते.5 ऑक्टोबर रोजी या संस्थेच्या कार्यालयात बांग्लादेशहून एक ईमेल आला. या ईमेलमध्ये एका 19 वर्षे मुलीला नोकरी लावण्याचा बहाण्याने बांग्लादेशहून भारतात आणले असून ती मुलगी सध्या कुठे आहे याची माहिती देण्यात आली होती . घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले. त्यांच्यासोबत रेश्मा तुपकर, आयोजक पुरोहित हे त्यांचे सहकारी होते .
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर
ठाण्याला येऊन त्यांनी ठाण्यात अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या अधिकाऱ्यांची भेट घेत सदर माहिती त्यांना दिली . माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील ,महिला पोलीस अधिकारी चव्हाण यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली . डोंबिवलीतील हेदूटणे गावाजवळ पोलिसांनी छापा टाकला.यावेळी सेलच्या अधिकाऱ्यांसोबत मानपाडा पोलीस देखील या कारवाईत सहभागी होते. सदर ठिकाणी पोलीस पोहोचले तेव्हा या ठिकाणी सात मुली आढळून आल्या. सोबत पाच दलाल देखील होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली . तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.
व्यापारास नकार देणाऱ्या मुलींना मारहाण
या सातही महिलांना बांग्लादेश होऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवून तर कुणाला उपचाराचे आमिष दाखवून भारतात आणण्यात आलं होतं . या मुलींसोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यानंतर या मुलींना जबरदस्तीने देह व्यापारात ढकलण्यात आलं. देह व्यापारास नकार देणाऱ्या मुलींना मारहाण देखील केली जात होती . पोलिसांनी या पाचही दलालाना बेड्या ठोकल्यात . या पाच जणांचा म्होरक्या युनूस शेख उर्फ राणा आहे . यासोबतच साहिल शेख, फिरदोस सरदार ,आयुब शेख, बीपलॉप खान अशी युनूसच्या अटक साथीदारांची नावे आहेत .
हे ही वाचा :
Pune Crime news : हॉटेलवरच चालायचा वेश्याव्यवसाय; पोलिसांनी सापळा रचना अन् थेट छापा टाकला...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)