भारतात येणार 100 टन सोने! RBI एवढ्या सोन्याचं हस्तांतरण का करतंय?
आपल्या देशात 100 टन सोने (Gold) येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) परदेशातून या सोन्याचं हस्तांतरण करणार आहे.
RBI Gold Purchase : आपल्या देशात 100 टन सोने (Gold) येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) परदेशातून या सोन्याचं विदेशातून आपल्या देशात हस्तांतरण आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणावर सोन्याचं हस्तांतरण करत आहे. सध्या आरबीआयकडे 822.1 टन सोने आहे. त्यातील निम्मे सोने परदेशात आहे. याशिवाय विदेशात जमा केलेले सोनेही मायदेशी आणले जात आहे.
भारताने खरेदी केलेले सोने आता इंग्लंडच्या तिजोरीत राहणार नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 100 टनांहून अधिक सोने हस्तांतरित केले आहे. सेंट्रल बँकेने 33 वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढं सोनं आपल्या रिझर्व्हमध्ये ठेवलं आहे. म्हणजे भारताने खरेदी केलेले सोने आता इंग्लंडच्या तिजोरीत राहणार नाही. त्यापेक्षा आता ते भारतीय रिझर्व्ह बँकेत ठेवण्यात येणार आहे.
देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी सोन्याची खरेदी
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मार्चअखेर आरबीआयकडे 822.1 टन सोने होते. यापैकी रिझर्व्ह बँकेने 413.8 टन सोने विदेशात ठेवले आहे. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षात, आरबीआयने त्यांच्या साठ्यामध्ये 27.5 टन सोन्याची भर घातली होती. अशा स्थितीत आरबीआय परदेशातून एवढे सोने का खरेदी करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आरबीआय हळूहळू परदेशात साठवलेल्या सोन्याचे प्रमाण कमी करुन ते भारतात आणत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी भारत आपले सोने परत आणत आहे. भारताला आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणखी सोन्याची गरज आहे. देशातील सोन्याचा साठा वाढला पाहिजे असं भारताचे नियोजन आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही वाढ सुरुच आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. त्यामुळं मोठ मोठ्या बँका, संस्था, सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. कारण सोन्यातील गुंतवणुक ही मोठ्या फायद्याची समजली जाते. कारण या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळत आहे. कारण सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळं अनेक बँकांचा आणि संस्थांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात कल वाढत आहे.
महत्वाच्या बातम्या: