IPO Updates : सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदार मालामाल, इको मोबिलिटीच्या आयपीओनं दिले दमदार रिटर्न
Eco Mobility IPO Listing: इको मोबिलिटी कंपनीनं 600 कोटींच्या उभारणीसाठी आयपीओ लाँच केला होता. तो आयपीओ तब्बल 65 पट सबस्क्राइब झाला होता.
नवी दिल्ली : इको मोबिलिटी कंपनीनं त्यांचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट केला. एकीकडे बाजारात घसरण दिसत असताना या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. इको मोबिलिटीचा आयपीओ लिस्ट होतानाच गुंतवणूकदारांना 17 टक्के फायदा मिळाला .
इको मोबिलिटीनं आयपीओ जारी करताना इश्शू प्राइस 334 रुपये निश्चित केली होती. 17.16 टक्क्यांच्या प्रिमियम सह हा आयपीओ 391.30 रुपयांना लिस्ट झाला. आतापर्यंतच्या माहितीनुसार या कंपनीचा शेअर 456 रुपयांपर्यंत पोहोचला होता. एका शेअर मागं गुंतवणूकदारांना साधारणपणे 110 रुपयांचा फायदा मिळाला आहे. इको मोबिलिटीच्या आयपीओच्या लॉटमध्ये 44 शेअर होते. गुंतवणूकदारांना एक लॉट घेण्यासाठी 14696 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. 456 रुपयांवर गेलेला शेअर 447 रुपयांवर आला होता. त्यानुसार 14969 रुपयांचे 19668 रुपये झाले आहेत. म्हणजेच एका लॉटवर गुंतवणूकदारांना 4972 रुपये मिळाले आहेत.
इको मोबिलिटी काय करते?
इको मोबिलिटी कंपनीची स्थापना 1996 मध्ये झाली होती. ही कंपनी कार रेंटल सर्विस पुरवते. ही कंपनी 21 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशात सेवा देते. देशातील 109 शहरांमध्ये कंपनीचा व्यवसाय आहे. दिल्ली, गुरुग्राम,मुंबई आणि बंगळुरुत कंपनीच्या सेवा आहेत.
इको मोबिलिटीचा आयपीओ 28 ऑगस्टला आला होता.त्यामध्ये गुंतवणूक करायची मुदत 30 ऑगस्टपर्यंत होती. हा आयपीएओ क्यूआयबी कॅटेगरीत 136.85 पट, एनआयआय मध्ये 71.17, रिटेल कॅटेगरीत 19.66 पट सबस्क्राइब झाला होता. एकूण सरासरीचा विचार केला असता 64.18 पट आयपीओ सबस्क्राइब झाला होता.
प्रीमियर एनर्जीजच्या आयपीओनं गुंतवणूकदार मालामाल
प्रीमियर एनर्जीज चा आयपीओ काल लिस्ट झाला होता. त्या आयपीओनं देखील गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट पैसे मिळाले होते.
प्रीमियर एनर्जीजच्या आयपीओची इश्शू प्राईस 450 रुपये प्रती शेअर होती. हा आयपीओ 990 रुपयांना लिस्ट झाला होता. त्यामुळं गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे मिळाले. सध्या या कंपनीचा शेअर 850 रुपयांवर आहे.
दरम्यान, भारतीय बाजारात आज घसरणीचं सत्र पाहायला मिळालं. बीएसई सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला होता. बाजारात घसरण असताना देखील इको मोबिलिटीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना तगडे रिटर्न दिले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या:
एका दिवसात पैसे डबल! शेअर बाजारावर येताच 'या' कंपनीने पाडला पैशांचा पाऊस