एक्स्प्लोर

रिझर्व्ह बँकेच्या ग्लोबल ट्रेड सेटलमेंटबद्दल माहिती आहे का? अर्थव्यवस्थेसाठी मोठी वाटचाल ठरणाऱ्या यंत्रणेची ही सविस्तर माहिती  

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने जागतिक बाजारपेठेत भारताची पोहोच वाढवण्यासाठी आणि व्यापार सुलभ करण्यासाठी रुपयात आयात-निर्यात सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने जागतिक बाजारपेठेत भारताची पोहोच वाढवण्यासाठी आणि व्यापार सुलभ करण्यासाठी रुपयात आयात-निर्यात सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा कशी काम करेल आणि भारताला काय फायदा होईल. कमोडिटी तज्ज्ञांनी ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी वाटचाल आहे असं म्हटलं आहे.

नेपाळ-भूतान वगळता जगातील बाकीचे देश केवळ डॉलर, येन, युरो आणि पाउंडमध्येच जागतिक व्यापार करतात. आरबीआयची नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर रुपयात व्यवहार करण्याचा मार्गही खुला होणार आहे असं कमोडिटी तज्ज्ञ अजय केडियांनी म्हटलं आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की ही प्रणाली सुरू केल्यानंतर भारताच्या निर्यातीला चालना मिळेल, कारण जगाने रुपयामध्ये स्वारस्य दाखवले आहे.

रशियाबरोबर व्यापार वाढवण्याची तयारी?
रुपयावरील डॉलर आणि इतर चलनांचा दबाव कमी करणे हा रिझर्व्ह बँकेचा उद्देश असला तरी, त्यासाठी एक नवीन प्रणाली विकसित केली जात आहे, परंतु काही तज्ञांचे म्हणणे आहे की या पावलामुळे रशियाशी व्यापार वाढण्यास मदत होईल. युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून, रशियावर अनेक निर्बंध लादले गेले आहेत आणि ते त्याचे राखीव डॉलर वापरण्यास सक्षम नाही. अशा परिस्थितीत नवीन प्रणाली आल्यानंतर रशियाशी व्यापार वाढण्यास मदत होईल. याशिवाय भारत इराणसह व्यापार निर्बंधांचा सामना करणाऱ्या इतर देशांशी व्यापार वाढवू शकेल.

परकीय चलनाच्या साठ्यावरचा भार कमी - 
परकीय चलनाच्या साठ्यावरील भार कमी करणे हे रिझर्व्ह बँकेचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. आरबीआयकडे असलेली सुमारे $590 अब्ज डॉलरची परकीय चलनाची गंगाजळी 10 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेशी असली, तरी सध्या रुपयावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेतील कोणत्याही देशाने आपल्या भारतीय चलनात व्यवहार केल्यास परकीय चलनाच्या साठ्यावरील दबाव कमी होईल. एवढेच नाही तर जागतिक बाजारपेठेत रुपयाची स्वीकारार्हताही वाढेल. लगेच नाही, पण हळूहळू देशाने रुपया स्वीकारला तर तो जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत उभा राहू शकतो.

नवीन यंत्रणा कशी काम करेल
जागतिक बाजारपेठेत रुपयाचा व्यापार करण्यासाठी इतर देशांनाही रुपयात पेमेंट घेण्याची व्यवस्था करावी लागेल असा सल्ला फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) चे सीईओ अजय सहाय यांनी दिला आहे.  काही भारतीय बँकांना आरबीआयसाठी वेस्ट्रो खाती उघडण्याची परवानगी देईल. या बँका इतर देशांचे चलन त्यांच्याकडे ठेवतील. या अंतर्गत भारतीय व्यावसायिक जेव्हा निर्यात करतात तेव्हा ते त्यांच्या नियमित बँकेमार्फत व्हेस्ट्रो खात्यासह बँकेत माहिती पाठवतात. व्हेस्ट्रो खाते असलेल्या बँकेतून निर्यातदाराच्या नियमित बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील. त्याचप्रमाणे, जेव्हा एखादा व्यवसाय आयात करतो, तेव्हा तो त्याच्या नियमित बँकेत पैसे देईल, जिथून पैसे वेस्ट्रो खात्यासह बँकेत जातील. चलनाची किंमत दोन्ही देशांच्या परकीय चलनावर आधारित असेल.

अशी व्यवस्था इराणने सुरू केली
भारताने यापूर्वी इराणशी व्यापारासाठी अशीच यंत्रणा विकसित केली होती. त्यानंतर इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे डॉलरमधील व्यापार ठप्प झाला. इराणकडून तेल खरेदीचे पैसेही रुपयात दिले जात होते. तथापि, 2019 मध्ये इराणकडून तेल आयात बंद झाल्यानंतर हे खातेही ठप्प झाले.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना, दरमहा 7000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 
10 वी पास महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना, दरमहा 7000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Embed widget