Delhi Election Result 2025 Live : जनतेने दिलेला कौल मान्य, अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, पराभव मान्य!
Delhi Assembly Election Results Live : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) पिछाडीवर पडला आहे. भाजप सत्तेच्या दिशेने आगेकूच करत आहे.

Background
Delhi Assembly Election Results 2025 LIVE : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली. दिल्लीत तब्बल 13 वर्षांपासून आम आदमी पक्षाची (AAP) एकहाती सत्ता आहे. यंदा अँटी इन्कबन्सी फॅक्टरच्या जोडीला भाजपने लावलेली प्रचंड ताकद 'आप'ची (AAP) सत्ता उलथवून लावेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी (Exit Polls 2025) व्यक्त केला आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने सत्तास्थापनेचा मॅजिक फिगर 36 चा आकडा ओलांडला आहे. भाजपने सत्तेच्या दिशेने कूच केली आहे. दुसरीकडे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठा धक्का ठरु शकतो.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांवर कोण बाजी मारणार, याबद्दल राजकीय वर्तुळाला उत्कंठा आहे. यापूर्वी 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली म्हणजे 'आप' आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झाले होते. परंतु, यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. भाजपकडून सातत्याने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांमुळे दिल्लीकरांचा अरविंद केजरीवाल आणि 'आप'वरील विश्वास डळमळीत होतो का, हे आज जाहीर होणाऱ्या निकालांमधून स्पष्ट होईल.
सुरुवातीच्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल, आतिशी, मनिष सिसोदिया हे आपचे सगळे दिग्गज नेते पिछाडीवर पडले. दिल्लीतील मध्यमवर्गीय मतं भाजपच्या दिशेने वळल्याचं चित्र आहे. दिल्ली निकालाचे सुपरफास्ट अपडेट पाहा एबीपी माझावर लाईव्ह.
राहुल गांधींना माझ्याशी सामना करावा, दिल्ली निकालावर प्रतिक्रिया देताना बावनकुळेचं गांधींना खुलं आव्हान
राहुल गांधींमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी 2029ची विधानसभेत माझ्याशी सामना करावा, असं खुलं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधींना दिलंय. पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन केल्यावर बावनकुळे यांनी हातात बॅट घेत, चौफेर फटकेबाजी ही केली. दिल्लीकरांनी आपला आणि काँग्रेसला चांगलेच धुतले, आता ईव्हीएम मशीन सेट होती. असा आरोप काँग्रेस आणि संजय राऊत करायला सुरुवात करतील, अशी खोचक टीका ही केली
जनतेने दिलेला कौल मान्य- अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी जनतेने दिलेला कौल मान्य केला आहे
त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
कठीण परिस्थिती असताना आपच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले, असे केजरीवाल म्हणाले आहेत.
यासह आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू, असेही ते म्हणाले.




















