(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पगार 10 लाख रुपये असला तरी शून्य कर, कसं शक्य आहे? जाणून घ्या नेमका फंडा काय?
तुमचा पगार 10 लाख रुपये असला तरी तुम्हाला एक रुपयाही कर द्यावा लागणार नाही. विशेष म्हणजे आयकर कायद्याचे नियम पाळून तुम्ही हा कर वाचवू शकता.
Tax Benifits : कर वाचवण्यासाठी लोक वेगवेगळे फंडे वापरतात. नव्या कर प्रणालीनुसार सात लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त आहे. तर जुन्या करप्रणालीनुसार पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त आहे. मात्र यापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर तुम्हाला कर भरावा लागू शकतो. मात्र तुमचे वार्षिक उत्पन्न हे दहा लाख रुपये असले तरीदेखील तुम्ही तुमचा कर वाचवू शकणार नाही. खालील फंडे वापरल्यास तुम्हाला एक रुपयाही कर देण्याची गरज नाही. हे कसे शक्य होईल, जाणून घेऊन घेऊ या...
10.50 लाख उत्पन्न असले तरी भरावे लागणार नाहीत पैसे
तुमचे वार्षिक उत्पन्न हे 10.50 लाख रुपये असेल तर तुम्हाला नियमानुसार 30 टक्के कर भरावा लागू शकतो. मात्र तुम्हाला हा कर वाचावायचा असेल तर वेगवेगळ्या नियमांअतर्गत तुम्हा तो वाचवू शकतोा.
1) स्टँडर्ड डिडक्शननुसार तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. म्हणजेच तुम्हाला आता दहा लाख रुपयांवरच कर लागेल.
2) PPF, EPF, ELSS, NSC अशा योजनांत तुम्ही गुंतवणूक केल्यास आयकरच्या अधिनियमाच्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला 1.5 लाख रुपयांवर करसवलत मिळते. म्हणजेच 10 लाख रुपयांतून 1.5 लाख रुपये कमी केल्यास आता तुम्हाला 8.5 लाख रुपयांवरच कर द्यावा लागेल. टैक्स के तहत आएगी.
3) तुम्ही जर NPS योजनेत वर्षाला 50,000 रुपये गुंतवणूक करत असाल तर कलम 80CCD (1B) च्या अंतर्गत तुम्हाला आणखी 50 हजार रुपये कर वाचवण्याची संधी उपलब्ध होते. म्हणजेच आता तुम्हाला 8 लाख रुपयांवरच कर द्यावा लागेल.
4) समजा तुम्ही गृहकर्ज घेतलेले असेलत तर आयकर कायद्याच्या कलम 24B अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते. म्हणजेच आता 8 लाख रुपयांतून 2 लाख रुपये वजा केल्यासत तुम्हाला फक्त सहा लाख रुपयांवर कर द्यावा लागेल.क
5) आयकर कायदा 80D अंतर्गत तुम्ही एखादा आरोग्य विमा घेऊन 25 हजार रुपयांपर्यंतचा टॅक्स वाचवू शकता. अशा प्रकारच्या आरोग्य विम्यात तुमचा, तुमच्या पत्नीचा, मुलांचा समावेश असायला हवा. तुमच्या आई-वडिलांचा आरोग्य विमा खरेदी करून तुम्ही आणखी 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त करसूट मिळवू शकता. म्हणजेच 6 लाख रुपयांतून 75 हजार रुपये वजा केल्यास तुम्हाला आता 5.25 रुपयांवरच कर द्यावा लागेल.
6) तुम्ही एखाद्या संस्थेला दान करत असाल तर तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यत करसूट मिळते. आयकर कायदा 80G अंतर्गत दान केलेल्या रकमेवर 25000 तुम्ही टॅक्स डिडक्शन क्लेम करू शकता. म्हणजेच हे 25 हजार रुपये वजा केल्यावर तुम्हाल फक्त 5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स द्यावा लागेल. जुन्या कर प्रणालीअंतर्गत तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न हे 10.50 लाख रुपये असले तरीदेखील तुम्हाला कर देण्याची गरज नाही.
हेही वाचा :
SIP करताना 'ही' एक काळजी घ्या, अन्यथा मोठं नुकसान झालंच म्हणून समजा!
रॉकेटच्या वेगाने पैसे वाढणार, फक्त 15 वर्षांत व्हा करोडपती; जाणून घ्या 12-15-20 चा फॉर्म्यूला काय?
श्रीमंत व्हायचंय? मग फक्त 'या' पाच गोष्टी पाळा; संपत्ती वाढलीच म्हणून समजा!