BUDGET 2021 Agriculture | कृषी क्षेत्राला अतिरिक्त निधी आणि अन्न प्रक्रियेसाठी विशेष घोषणेची अपेक्षा
Union Budget Agriculture Sector Expectations : कोरोना काळात अनेक क्षेत्रांना मोठा धक्का बसला आहे. अर्थव्यवस्थाही कोलमडली होती. अशातच कोरोनाकाळात कृषी हे विकासाचं एकमेव क्षेत्र होतं. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत.
Union Budget Agriculture Sector Expectations : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना संकटात सादर होणाऱ्या या बजेटमध्ये सरकारद्वारे प्रत्येक क्षेत्राला मोठ्या घोषणेची आशा आहे. कोरोनामध्ये कृषी हे विकासाचं एकमेव क्षेत्र होतं. अशातच केंद्री बजेट 2021-22 मध्ये अनेकांना मोठ्या अपेक्षा आहेत. या क्षेत्रात विशेषतः कृषी ऋण, पंतप्रधान किसान आणि सिंचन यांसारख्या क्षेत्राला मोठ्या घोषणेची शक्यता आहे. सरकारला कृषी क्षेत्रातील समग्र विकास हेतूमध्ये स्वदेशी कृषी संशोधन, तेलबिया उत्पादने, खाद्य प्रक्रिया आणि जैविक शेतीसाठी अतिरिक्त निधी आणि प्रोत्साहन आवश्यक आहे.
कृषी क्षेत्राच्या बजेट 2021-22 कडून अपेक्षा :
1. डाळी, प्राणी प्रथिनं आणि डेअरी यांसारख्या क्षेत्रांच्या अपूर्ण मागणीकडे लक्ष
डेलॉयट इंडियाचे पार्टनर आनंद रामनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळी, पशु प्रोटीन आणि डेअरी यांसारख्या क्षेत्रांमध्ये पुरवठा-मागणीशी जुळत नसलेली वाढ यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण हे प्रमाण असमान हरितक्रांती पिकांकडे होती. रामनाथन पुढे म्हणतात की, "हे एक निर्णायक दृष्टिकोण घेण्याची आणि एक किंवा दोन क्षेत्र यांसारख्या तेलबिया आणि डाळी यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आहे. या पिंकांबाबत आपणही सध्या आयात करण्यावर भर देत आहोत."
2. प्रोसेसिंग फूडसाठी गाईडलाईन्स
अजय एस श्रीराम, अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रबंध निर्देशक, डीसीएम श्रीराम लि. यांचं म्हणणं आहे की, "कृषी आणि त्यासंबंधित प्रक्रियांसाठी आगामी बजेटमध्ये काही महत्त्वाच्या घोषणांची आवश्यकता आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीने शेतकऱ्यांसाठी उत्तम मुल्य वसुली यांमध्ये खर्च कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यानुसार, बजेट 2021-22 मध्ये फूड प्रोसेसिंगसाठी विशेष प्रोत्साहन देणं आवश्यक आहे."
3. डीबीटीच्या लाभांसोबत शेतकरी बियाणं खरेदी करु शकतात. नव्या गोष्टींचा वापर करु शकतात. पाण्याचा उत्तम वापर करु शकतात. याव्यतिरिक्त अशीच काही दुसरी कामं केली जाऊ शकतात.