एक्स्प्लोर

उद्योगपतींना 13 हजार कोटींची कर्जमाफी, आता शेतकऱ्यांचीही संपूर्ण कर्जमाफी करा, किसान सभेची मागणी, अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय?  

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या आज अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेती क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे

Ajit Nawale on Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या आज अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषत: शेती क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात शेती क्षेत्राच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? याबाबत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योगपतींना 13 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना देखील संपूर्ण कर्जमाफीची गरज असल्याचे अजित नवले म्हणाले. यासोबतच विविध खतांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी देणे गरजेचे आहे. मागील काळात ही सबसिडी कमी करण्यात आली आहे. यासोबतच जीएसटीच्या जाचातून विविध शेती संदर्भातील साधने आणि संसाधने यांना वगळल पाहिजे ही आमची मागणी असल्याचे अजित नवले म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले अजित नवले? 

मागील अर्थसंकल्पामध्ये खतावर दिली जाणारी सबसिडी घटवण्यात आली आहे. शेती साधने, सेवा व निविष्टांच्या अनुदानांमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोठा जीएसटी आणि कर लावण्यात आले आहेत. परिणामी शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नव्या अर्थसंकल्पामध्ये यात सुधारणा करुन शेती अनुदानांमध्ये वाढ करणे व लावण्यात आलेले कर कमी करुन शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले टाकण्याची आवश्यकता असल्याचे अजित नवले म्हणाले.  

शेतीमालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी नियोजन करावं

गेल्या काळात शेतीमालाचे भाव सरकारी हस्तक्षेप करून वारंवार पाडण्यात आले. निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य व निर्यात कराच्या माध्यमातून शेतकरी विरोधी हस्तक्षेप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा अत्यंत विपरीत परिणाम झाला. नव्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत सुधारणा करून शेतीमालाच्या निर्यातीला चालना देण्याची तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळेल यासाठी ठोस आर्थिक तरतूद व नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे अजित नवले म्हणाले. 

पीक विम्यातील भ्रष्टाचार दूर करुन ठोस मदत मिळावी 

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई पिक विम्याच्या माध्यमातून मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र पीक विम्यातील भ्रष्टाचार व पिक विमा योजनेची कॉर्पोरेट धार्जीनी चौकट यामुळे शेतकऱ्यांना याबाबत पुरेशी संरक्षण मिळत नाही. नव्या अर्थसंकल्पात पीक विम्यासाठी भरीव तरतूद करत असताना, पिक विमा शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांना दिलासा देणारा कसा ठरेल याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे अजित नवले म्हणाले. ग्रामीण भागात रोजगाराला चालना देण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या निधीमध्ये भरीव वाढ व प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणारी धोरणे घेण्याची आवश्यकता असल्याचे अजित नवले म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 27 March 2025MNS Banners : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, उद्धव ठाकरे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 27 March 2025Bajrang Sonwane On Santosh Deshmukh | यंत्रणांनी वेळीच पावलं उचलली असती तर देशमुख वाचले असते- बजरंग सोनवणे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
Embed widget