एक्स्प्लोर

Anuradha Mahindra : आनंद महिंद्रांच्या पत्नी अनुराधा महिंद्रा कोण? लाईफस्टाईल मासिकाच्या संपादिका, कोट्यवधींचा व्यवसाय चालवतात

Anand Mahindra Love Story : आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या आजीची जुनी अंगठी देऊन अनुराधा महिंद्रा यांना प्रपोज केलं होतं. त्यावेळी अनुराधा या 17 वर्षांच्या होत्या. 

Anand Mahindra Wife : एल अँड टी ग्रुपचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना 90 तास काम केलं पाहिजे असं आवाहन केलं होतं. किती वेळ तुम्ही तुमच्या बायकोकडे बघत बसणार, त्यापेक्षा जास्तीत जास्त तास काम करा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली. आपली पत्नी खूप सुंदर असून तिच्याकडे पाहत बसायला आपल्याला आवडते असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं होतं. तुम्ही किती तास काम करता हे महत्त्वाचं नसून किती गुणवत्तापूर्ण काम करता हे महत्त्वाचं असल्याचं महिंद्रा यांनी यावेळी सांगितलं. आनंद महिंद्रांच्या या उत्तरानंतर मात्र त्यांच्या पत्नीबाबत (Anand Mahindra Wife) सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अनुराधा महिंद्रा (Anuradha Mahindra) असं आनंद महिंद्रा यांच्या पत्नीचं नाव आहे. 

एका उद्योगपतीची पत्नी असल्या तरी अनुराधा महिंद्रा यांनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. त्या महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगसमूहासाठी काम करत नाहीत तर त्या एका मासिकाच्या संपादिका आहेत. 

आजीची अंगठी देऊन फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज

अनुराधा महिंद्रा यांचा जन्म मुंबईत झाला. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केलं. आनंद महिंद्रा हे इंदूरमध्ये फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होते. त्यावेळी त्या दोघांची भेट झाली. त्यावेळी अनुराधा या 17 वर्षांच्या होत्या. 

आनंद महिंद्रा यांना अनुराधा या पहिल्या नजरेतच आवडल्या. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी अनुराधा यांना प्रपोज केले. आनंद महिंद्रा यांनी अनुराधा यांना त्यांच्या आजीची जुनी अंगठी देऊन फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. आजही ती अंगठी अनुराधा यांच्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. यानंतर दोघांनी 17 जून 1985 रोजी लग्न केले आणि ते अमेरिकेला गेले.

पत्रकारितेला करिअर म्हणून निवडलं

अनुराधा महिंद्रा यांनी बोस्टन विद्यापीठातील कम्युनिकेशन प्रोग्रामचा अभ्यास केला. कौटुंबिक व्यवसायाचा भाग न होता अनुराधा यांनी पत्रकारितेला आपले करिअर म्हणून निवडले. त्या रोलिंग स्टोन इंडियाच्या मुख्य संपादिका झाल्या. 'द इंडिया स्टोरी'च्या सल्लागार मंडळाच्या सदस्यही होत्या.

Man’s World Founder : मॅन्स वर्ल्ड मासिकाच्या संपादिका

अनुराधा महिंद्रा या मॅन्स वर्ल्ड (Man’s World) या प्रसिद्ध मासिकाच्या संस्थापिका आहेत. हे देशातील महत्त्वाच्या लाईफस्टाईल मासिकांमधील एक आहे. या कामात त्यांना त्यांच्या दोन मुली, दिव्या आणि आलिका यादेखील मदत करतात. अनुराधा महिंद्रा यांची जीवनशैली ही अत्यंत आलिशान आहे. अनुराधा महिंद्रा या केसी महिंद्रा ट्रस्टच्या माध्यमातून गरीब मुलांसाठी अनेक कामं करतात. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special ReportEknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special ReportSupriya Sule Speech Parbhani : पैसै नको लेक द्या, आईचा आक्रोश सांगताना सुप्रिया ताई हळहळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget