एक्स्प्लोर

Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...

Anand Mahindra : महिंद्रा उद्योग समुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी कामाच्या तासांऐवजी कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेकडं लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

नवी दिल्ली : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आठवड्यांचे कामाचे तास नेमके किती असावेत या वादात उडी घेतली आहे. एल अँड टी ग्रुपचे चेअरमन  एसएन सुब्रह्मण्यन यांनी त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना एका आठवड्यात 90 तास काम करायला पाहिजे, असं म्हटलं होतं. त्यानंतर सुब्रह्मण्यन यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आनंद महिंद्रा यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युवा महोत्सवात यासंदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले, खरा प्रश्न किती तास काम करता हा नसून गुणवत्तापूर्ण निर्मितीचा आहे. 


आपल्याला कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेवर भर दिला पाहिजे,आपण काम किती तास करतो याचा विचार करणं आवश्यक नाही. हा प्रश्न 40 तास, 70 तास किंवा 90 तासांचा नाही. तुम्ही केलेल्या कामानंतर कशा प्रकारचा आऊटपूट मिळतो ते महत्त्वाचं आहे, असं आनंद महिंद्रा म्हणाले. फक्त 10 तासांचं चांगलं काम देखील महत्त्वाचा बदल घडवू शकतं, असं ते म्हणाले. 


आनंद महिंद्रा यांनी वैविध्यपूर्ण जीवनासंदर्भात देखील बाष्य केलं. नागरिकांना वेगवेगळ्या क्षेत्रासंदर्भात गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. कला आणि संस्कृती तुम्हाला चांगला निर्णय घेणारा व्यक्ती बनवू शकते. तुम्हाला जेव्हा कला, संस्कृती संदर्भात माहिती असते. तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतात तेव्हा तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, असं आनंद महिंद्रा म्हणाले. 

कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवता तेव्हा त्याचं प्रतिबिंब वैयक्तिक निर्णयक्षमतेत आणि सृजनशीलतेमध्ये होतं, असंही आनंद महिंद्रा म्हणाले.  तुम्ही जर फक्त पूर्णवेळ ऑफिसमध्ये असाल, तुमच्या कुटुंबासोबत नसाल किंवा इतरांच्या कुटुंबासोबत नसाल तर लोकांना नेमकं काय खरेदी करायचं आहे हे तुम्हाला कसं कळेल, असा सवाल देखील आनंद महिंद्रा यांनी केला. 

एक्स प्लॅटफॉर्मवर काम सोडून किती वेळ घालवता अशा स्वरुपाच्या फॉलोअर्सकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत देखील आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, मला स्पष्ट करु द्या, मी एकटा आहे म्हणून एक्स वर आहे असं नाही.माझी पत्नी चांगली आहे, तिच्यासोबत वेळ घालवायला मला आवडतं. एक्सवर मी मित्र तयार करण्यासाठी आलेलो नाही. मी इथं आहे कारण लोकांना माहिती नाही की हे किती शक्तिशाली व्यावसायिक साधन आहे. मला इथं, 11 दशलक्ष लोकांकडून प्रतिसाद मिळत असतो.

एल अँड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी एका आठवड्यात 90 तासांच्या कामाच्या संकल्पनेचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांपुढं मांडला होता. कर्मचाऱ्यांनी रविवारी देखील काम करायला पाहिजे, असं ते म्हणाले होते. तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहत बसणार, असं ते म्हणाले होते. त्यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती.

इतर बातम्या :

मी तर आठवड्यात 100 तास काम करतो, 90 तास काम करण्याच्या वादात आणखी एका व्यवसायिकाची उडी

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget