एक्स्प्लोर

भारतीय परंपरेशी जोडला गेलेला ‘हातमागाचा धागा’, हातमाग दिनाची सुरुवात का करण्यात आली?

National Handloom Day 2023 : हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच या वस्तूंची मागणी वाढावी, यासाठी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. 2015 साली चेन्नईमध्ये 'इंडिया हँडलूम' या ब्रँडचे अनावरण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑगस्ट हा दिवस हातमाग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.  

हातमाग म्हणजे काय? 

ज्या यंत्रावर किंवा मशीनवर कापड विणले जातं, त्याला 'माग' म्हणतात. यावर हाताच्या सहाय्याने वस्त्र विणले जाते म्हणून त्याला 'हातमाग' म्हटले जाते. हातमागावर सुती किंवा रेशमी कापड उभ्या आणि आडव्या धाग्यांनी विणले जाते. 

7 ऑगस्टला हातमाग दिवस का साजरा केला जातो? 

स्वातंत्र्य चळवळीत स्वदेशी वस्तू वापराचा नारा देण्यात आला. या स्वदेशीच्या ठिणगीने देशातल्या हातमाग उद्योगाला नव्याने चालना मिळाली. विदेशी वस्तूंची होळी करुन 7 ऑगस्ट 1905 रोजी ‘स्वदेशी’चा नारा देण्यात आला. याच स्वदेशी आंदोलनाची आठवण म्हणून आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'राष्ट्रीय हातमाग दिवस' साजरा करण्यात येतो.

हातमागाच्या वस्तूंचा वापर का करावा?

भारत वैविध्यपूर्ण देश आहे. भारतात अनेक भाषाचे, संस्कृतीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. तशाच विविध कला या भारत भूमीत आहेत. त्यातलीच एक कला म्हणजे हातमाग. हातमाग व्यवसाय हा देशातील सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक उद्योग आहे. देशातील ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. आपल्या देशात शेतीनंतर हातमाग व्यवसाय हा दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा रोजगाराचा पर्याय आहे. हातमागावर कापड विणण्याची कला पारंपरिक आहे. आपल्या देशातल्या विविध राज्यांमध्ये विविध कला आहेत. त्यामुळे आपल्या या व्यवसायातून देशातील विविध कलेंचे आणि संस्कृतींचे नमुने जपता येतात. त्यासोबत पर्यावरणपूरक आणि पारंपरिक वस्तूंचा ठेवा जपला जाऊन, त्या तयार करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन मिळतं. जवळपास देशभरातील 45 लाखांहून अधिक लोक या उद्योगावर अवलंबून आहेत. 

परंतु वाढत्या कारखानदारीमुळे आणि स्पर्धेमुळे भारतातील हातमाग व्यवसाय सध्या अडचणीच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. मशीनवर तयार होणारं वस्त्र तुलनेने कमी किंमतीत बाजारात उपलब्ध असल्याने त्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळतो.

हातमागावरचं वस्त्र उंची किंमतीला असलं तरी त्यामुळे अनेकांना रोजगार मिळून अर्थव्यवस्थेला चालना देणारं आहे. प्रत्येकवेळी हे खरेदी करणं शक्य नसलं तरी प्रत्येकाकडे एखादं तरी हे असणं अभिमानाचं आहे. याच उदाहरण द्यायचं झालं तर एका साडीमुळे १५ कारागिरांना रोजगार प्राप्त होतो. हे कापड टिकाऊ असल्याने रिसायकल पद्धतीने देखील पुन्हा वापरता येते. त्यामुळे हातमागाच्या कापडाचं महत्व आणि सुंदरता वापरल्यानंतरच लक्षात येणारं आहे. 

हातमागाच्या वस्तूंना त्या तयार करणाऱ्या कारागिरांना बळ मिळावं म्हणून देशभरात प्रदर्शनं आणि बाजारपेठा भरवल्या जातात. मिनिस्टरी ऑफ टेक्स्टाईलनेही वेगवेगळे प्रकल्प राबवून हातमाग व्यवसायाला उभारी देण्याचे प्रयत्न करत आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांना विणकरांशी थेट संपर्क करणं शक्य होत आहे. 

भारतातल्या वस्त्रउद्योगाला प्रचंड मोठा इतिहास आहे. आपल्या या पारंपरिक कलेची, बदलत्या काळानुरुप गुंफण घालली तर ही कला जगभरात दिमाखात पोहचण्यास मदत होईल. मात्र या सगळ्यासाठी सर्वात आधी आपण ही परंपरा टिकवणं, रुजवणं आणि वाढवण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवर भारताची कलात्मक ओळख टिकवून ठेवणाऱ्या असंख्य हातमाग कारागिरांना 'राष्ट्रीय हातमाग दिवशी सलाम!

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget