एक्स्प्लोर

दिल्लीदूत : राहुल गांधींचा कायापालट : कुमारवर्मा की बाहुबली?

राहुल गांधी यांनी असं कुठलं इंजेक्शन घेतलं की आज मोदींसारख्या मातब्बर पैलवानासमोर ते तोडीस तोड वाटू लागलेत? सोशल मीडियावर त्यांची टवाळी कमी होऊन तिचा रोख मोदींच्या दिशेने जास्त वळलाय?

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचा कायापालट हा सध्या देशात चर्चेचा विषय बनलेला आहे. काल परवापर्यंत जे राहुल गांधी भाजपसह सोशल मीडियावर टिंगलटवाळीचा विषय बनलेले होते, त्याच राहुल गांधींमध्ये आता अनेकांना मोदींविरोधातल्या लढाईसाठी नायक दिसू लागलाय. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल राहुल गांधींच्या क्षमतेबद्दल एक विधान करुन भलतीच धमाल उडवून दिली. काँग्रेसवाल्यांना राहुल गांधींच्या क्षमतेवर किती विश्वास आहे हे माहिती नाही, पण राऊतांसारख्या कट्टर शिवसैनिकाने राहुल आता ‘पप्पू’ राहिलेले नाहीत, ते काय म्हणतायत याकडे लोक गांभीर्याने पाहतायत अशी टिपण्णी करुन भाजपला सावधानतेचा इशारा दिलाय. तर खरंच असं काय झालं की अचानक राहुल गांधी एवढे बदललेत? राहुल गांधी यांनी असं कुठलं इंजेक्शन घेतलं की आज मोदींसारख्या मातब्बर पैलवानासमोर ते तोडीस तोड वाटू लागलेत? सोशल मीडियावर त्यांची टवाळी कमी होऊन तिचा रोख मोदींच्या दिशेने जास्त वळलाय? हा बदल, हा कायापालट खरंच झालाय की केवळ तात्कालिक आभासी आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्वाचं आहे. राहुल गांधींमधला हा तथाकथित बदल कसा आहे हे समजण्यासाठी आधी ‘बाहुबली’ हा चित्रपट डोळ्यासमोर आणा. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कुमारवर्मा नावाचं एक पात्र आहे. हा कुमारवर्मा आधी काहीसा भित्रा, नेभळट दाखवलेला आहे. पण चित्रपटात एका मोक्याच्या क्षणी त्याच्यात परिवर्तन होतं. ‘समय हर कायर को मर्द बनने का एक मौका देता है’ असं काहीतरी बाहुबलीचं आवेशपूर्ण वचन ऐकून कुमारवर्माच्या भुजांमध्ये प्रचंड बळ येतं आणि त्यानंतर बदललेला कुमारवर्मा दिसत राहतो. सांगायचा उद्देश हा की राहुल गांधींमधला हा बदल सध्या कुमारवर्मासारखा आहे. बाहुबली बनण्यासाठी त्यांना अजून बरीच मजल मारावी लागणार आहे. कारण राहुल गांधींमधला हा बदल दिसू लागल्यावर आता गुजरात आपण जिंकल्यात जमा आहोत, अशा थाटात काँग्रेसजन वावरु लागल्याचं दिसतंय. त्यांना जमिनीवर आणण्यासाठी, वास्तवाचं भान करुन देण्यासाठी ही तुलना समजून घेणं आवश्यक आहे. गुजरातमध्ये जे वातावरण तयार झालंय, त्यात काँग्रेसची मेहनत किती, राहुलजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव किती हा संशोधनाचा भाग आहे. राहुल गांधींचे पंचेस चांगले बसताहेत, त्यांचा आत्मविश्वास, वक्तृत्वशैली सुधारलीय यात शंका नाही. पण हा सगळा आवेश दुसऱ्यांच्या जीवावर आहे. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर हे तीन तरुण भाजप सरकारला शिंगावर घेत नसते तर आज जी चमक राहुल गांधींमध्ये जाणवू लागलीय ती प्रत्यक्षात तितकी दिसली असती का याचं भान ठेवायला हवं. काँग्रेसने या राज्यात तयार केलेला एक नेता दाखवा. किमान 2014 नंतर मोदींसारखा विरोधक या राज्यातून पुढे येताना एका तरी नेत्यावर या पक्षाने मेहनत घ्यायला हवी होती. पण असं राज्यव्यापी, मासबेस असलेलं एकही नाव पुढे येत नाही. राहुल गांधींमध्ये बदल दिसतोय याचं कारण हेही आहे, की तीन वर्षांपूर्वीचे मोदीही बदललेत. भाजपच्या अनेक आश्वासनांमुळे जे आभासी चित्र तयार झालं, त्याचा फुगा हळुहळू फुटू लागलाय. नोटबंदीचा आततायीपणा, जीएसटीची फसलेली अंमलबजावणी, इंधन दरवाढीचा बॉम्ब हे या वातावरणाला चालना देणारे प्रमुख घटक ठरले. राहुल गांधींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलू लागलाय, त्यात हे सरकारविरोधी वातावरणही कारणीभूत आहेच. आता त्यांच्या या बदलाबद्दल बोलताना ते आधी आपल्यासमोर काय म्हणून ठसवले गेलेत याचा विचार करुया. राहुल गांधींची पप्पू ही इमेज केवळ भाजपच्या रणनीतीचा भाग आहे. राहुल गांधी यांना या देशात एक सीरियस लीडर म्हणून प्रस्थापित होऊच द्यायचं नाही या उद्देशाने आखलेली ही नीती. सोशल मीडियावरुन असे कितीही हल्ले भाजपने चढवले तरी याचा अर्थ ते राहुल गांधींना सीरियसली घेत नाहीत असा कधीच नव्हता. उलट राहुल गांधींच्या प्रत्येक वक्तव्यावर भाजपची बारीक नजर असते. उगीच त्यांच्या एका वक्तव्यानंतर प्रतिहल्ला करायला लगेच दहा-बारा मंत्र्यांची फौज मैदानात उतरत नाही. राहुल गांधींना भाजप किती सीरियसली घेतो याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे ‘सूट-बूट की सरकार’. गेल्या तीन वर्षातली राहुल गांधींची ही सर्वात शार्प अशी राजकीय कमेंट. या कमेंटआधीचे मोदी आणि नंतरचे मोदी यात भरपूर फरक आहे. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर मोदींचे ज्या पद्धतीने विदेश दौरे सुरु होते, एका ठराविक वर्तुळातली उठबस चर्चेत होती त्या पार्श्वभूमीवर ही कमेंट मोदींना बोचणारी आणि त्यांचे डोळे लख्ख उघडणारी होती. भारतासारख्या देशात राज्य करायचं असेल तर आपली अशी प्रतिमा जाऊन चालणार नाही याचा तात्काळ अंदाज त्यांनी बांधला असावा. त्यानंतर मोदींची ‘pro poor’ म्हणजे ‘गरिबांचा वाली’ अशी इमेज दिवसेंदिवस बळकट होताना दिसतेय. ती किती योग्य किंवा आवश्यक हा विषय वेगळा. पण मोदींच्या या बदलात या टीकेचं श्रेय आहे हे नक्की. अर्थात हा बदल इमेजबद्दल जागरुक असल्यानेच मोदींनी केला हेही मान्य करावं लागेल. मिळालीय सत्ता, मग आता कोण आपलं वाकडं करणार अशी एक ठराविक काँग्रेसी छापाची वृत्ती त्यांनी ठेवली असती तर हेही नसतं झालं. त्यामुळे राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवण्याची भाजपची रणनीती किती काळ टिकेल याबद्दल शंका आहे. कारण गेल्या काही काळात सोशल मीडियावरच्या विनोदांची जागा राहुलऐवजी मोदींनी घेतलीय. चित्रपट असो की राजकारण समोरच्यांच्या प्रतिसादावर समोरच्या नायकाचं मूल्य वरखाली होत असते. राहुल गांधींचे वनलाईनर ज्या पद्धतीने हिट व्हायला लागलेत ते बघता राहुल गांधींच्या भाषणकारांनी, त्यांच्या ट्विटर आर्मीने भारतीय जनमानसाची नाडी किमान बरोबर ओळखलीय असं म्हणायला हरकत नाही. जीएसटीसारख्या बोजड आर्थिक विषयावर त्यांनी कितीही आकडे, चिंतन फेकलं असतं तरी ते सगळं पब्लिकच्या डोक्यावरुन गेलं असतं. त्याऐवजी रुपेरी पडद्यावरचा आजवरचा सर्वात लोकप्रिय खलनायक गब्बरसिंहचा खुबीने वापर करत त्यांनी जीएसटीला ‘गब्बर सिंग टॅक्स’ची उपमा देत नेमकी तार छेडली. चिदंबरम यांच्या अभ्यासू लेखमालांनी, आनंद शर्मांच्या लांबलचक भाषणाने, देशात ठिकठिकाणी उपचारात्मक आंदोलनं करुन जो परिणाम साधला नसता तो या एका टिपण्णीने अचूक साधला. ही कमाल पुढच्या काळात सातत्याने करत राहण्याचं आव्हान काँग्रेसला राखावं लागेल. अजून एक जाणवणारा बदल म्हणजे राहुल गांधी हे सभ्य, सहृदयी माणूस आहेत ही ओळख जास्तीत जास्त ठसवण्यात काँग्रेस यशस्वी होतेय. राहुल गांधी प्रत्यक्षातही तसे आहेत याबद्दल वादच नाही. पण त्यांच्या पप्पू इमेजमुळे ती आजवर झाकोळली गेलीय. स्वतःवर जे जोक होतायत त्यालाही खिलाडूपणाने घेत त्यांनी परवा गुजरातमध्ये ‘इन लोगों ने मेरी पिटाई कर करके मेरी आंखे खोल दी’ हे वक्तव्य म्हणूनच महत्वाचं होतं. यातून त्यांच्यातला एक दिलदार माणूस समोर आला. शिवाय गेल्या काही दिवसांपासून मोदी, जेटलींवर टीका करताना ट्विटरवर एका दर्जेदार विनोदाची झलकही दिसू लागलीय. हे ट्विटर हँडल ते स्वतः सांभाळत नसले तरी किमान अशा विनोदबुद्धीने वार करण्याची काँग्रेसची नीती चांगलीच यशस्वी झालीय. त्यामुळेच राहुल गांधींच्या गब्बर सिंह टॅक्स या एका कमेंटनंतर ट्विटरवर अशाच गमतीशीर उपमांचा अक्षरश: पाऊस पडला. राहुल गांधींच्या सध्याच्या बहुचर्चित बदलामधल्या या काही चांगल्या, काही वाईट गोष्टी. या बदलाने लगेच हुरळून न जाता काँग्रेस जमिनीवर मेहनत घेत राहिली, आपल्या चुका सुधारत राहिली तर काही आशादायी चित्र दिसत राहील. नाहीतर गुजरातप्रमाणे हार्दिक, अल्पेश, जिग्नेश जवळ आले की लगेच मोदींना जणू धोबीपछाड दिल्याच्या भ्रमात त्यांनी राहू नये. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीचं उदाहरण आठवा. राहुल आणि अखिलेश यांची जेव्हा युती झाली होती, हे दोघे यूपी के लडके म्हणून झळकू लागले तेव्हा आता आपल्याला चांगले दिवस येणार असं काँग्रेसला वाटू लागलं होतं. मीडियाही पारंपरिक जातीच्या समीकरणातून आकडेमोड करत बसली होती, पण भाजपनं ही सगळी जुनाट समीकरणं उधळून लावली. गुजरात हे पंतप्रधानांचं राज्य आहे हे विसरता कामा नये. शिवाय उत्तर प्रदेश काय किंवा गुजरात काय प्रत्येकवेळी अशा परोपजीवी भूमिकेतून लवकर बाहेर पडलेलं काँग्रेसच्या हिताचं आहे. नाहीतर अशा टेकूचं राजकारण करत राहिले तर काँग्रेससारख्या वटवृक्षाचं रुपांतर अशोकाच्या झाडात व्हायला वेळ लागणार नाही. बाकी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा मुहूर्त जवळ येत असतानाच त्यांच्या कायापालटाची सुचिन्हं दिसू लागणं हे काँग्रेसजनांच्या जीवात जीव आणणारं आहे. राजकारणात प्रत्येक नेत्याची एक वेळ असते. उद्या मोदींना प्रधानसेवक या निकषावरच तपासून जनतेनं त्यांच्या कामाचं मूल्यमापन करायला सुरुवात केली, जातीयतेच्या राजकारणाला दूर ठेवून हिंदुत्ववादी संघटनांचा उन्माद बंद करायचं ठरवलं तर आपोआप जनता नव्या पर्यायाकडे वळेल. अशावेळी आपली एक किमान पात्रता वाढवून, आपला राजकीय बायोडेटा तयार ठेवणं राहुल गांधींना आवश्यक आहे. ते अजून कितपत तयार झालेत याबद्दल शंका आहे, पण किमान त्यादृष्टीने त्यांची मेहनत सुरु झालीय. बाकी राहुल गांधी राजकारण एन्जॉय करताहेत, त्यांना ते ओझं वाटत नाहीय हे दिसत राहणंही दिलासादायकच ! दिल्लीदूतसदरातील याआधीचे ब्लॉग:

दिल्लीदूत : मंत्रिमंडळ विस्तारात या 10 गोष्टींवर सर्वांची नजर असेल

दिल्लीदूत : सेक्युलरवाद्यांचा खांब कोसळला! दिल्लीदूत : काश्मिरीयतचा अनुभव देणारी कारगील मॅरेथॉन दिल्लीदूत : नितीश, मोदींच्या आडोशातलं रोपटं बनणार की विरोधातला वटवृक्ष? दिल्लीदूत : मोदींची कुणाशी स्पर्धा सुरु आहे? दिल्लीदूत: राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास काय सांगतो? दिल्लीदूत : राष्ट्रपतीपदासाठी मोदींचं दलित कार्ड BLOG: मनमोकळ्या मूडमधले अमित शहा दिल्लीदूत : कोण असणार मोदींचे कलाम? दिल्लीदूत : भ्रमाचा भोपळा दिल्लीदूत : लोकसभेत ‘सेना स्टाईल’ कामगिरीनं गाजलेला दिवस ! दिल्लीदूत : मराठा तितुका झोडपावा.. इलेक्शन डायरी- मोदी वाराणसीत, तसे राहुल अमेठीत का नाही? इलेक्शन डायरी : गोरखपूरचं समांतर सरकार- योगी आदित्यनाथ इलेक्शन डायरी : वाराणसीत तळ ठोकून का आहेत मोदी? दिल्लीदूत : बीएमसी- दिल्लीकरांनी लादलेलं युद्ध हार्दिक पटेल गुजरातचा बाळासाहेब ठाकरे होऊ शकेल? दिल्लीदूत : सत्तांतराचा लखनवी एपिसोड दिल्लीदूत : एक अनुभव राजधानीतल्या बाबूशाहीचा दिल्लीदूत : गालिब की हवेली दिल्लीदूत : शांतता, गोंधळ चालू आहे! दिल्लीदूत : काही ( खरंच) बोलायाचे आहे… दिल्लीदूत : दीदी बडी ड्रामा क्वीन है.. दिल्लीदूत : जेव्हा मनमोहन सिंह बोलतात…
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कारManoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
Embed widget