Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरी
Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरी
बीड... जवळपास गेले तीन महिने राज्याचं राजकारण या एकाच जिल्ह्याभोवती फिरतंय. याच बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार आज जिल्हा दौऱ्य़ावर होते. पण बीडमधलेच अजितदादांच्या पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे मात्र मुंबईत एका फॅशन शोमध्ये दिसले. होय तुम्ही बरोबर ऐकलात, फॅशन शो मध्ये. आता हा फॅशन शो कुणाचा होता? या फॅशन शो साठी मुंडेंनी बीडमधल्या अजितदादांच्या कार्यक्रमांना दांडी मारली? कीय यामागे आणखी काही कारण होतं? याचाच आढावा घेऊयात राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून...
या रॅम्पवॉकची फॅशन जगतात किती चर्चा झाली याची ठोस माहिती नाही... मात्र राजकीय वर्तुळात सध्या हा फॅशन शो जोरदार चर्चेत आहे... आणि त्यासाठी कारणीभूत या रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल नाहीत... तर हा फॅशन शो पाहणारी ही व्यक्ती... डोळ्यांना जरा त्रास द्यावा लागेल... हे आहेत कृषीमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे...
धनंजय मुंडेंची थोरली लेक वैष्णवीनं अमेरिकेत शिक्षण घेत फॅशन मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलीय.. आता आपल्या लेकीचं कौतुक म्हणून धनंजय मुंडेंनी फॅशन शो पाहण्यासाठी तब्येत बरी नसतानाही बीडहून मुंबई गाठली.. अर्थात धनंजय मुंडेंमधल्या पित्याचं कौतुक केलं पाहिजे.. पण धनंजय मुंडेंना सध्या जाब विचारला जातोय तो त्यांनी मंगळवारी रात्री केलेल्या ट्विटवरून




















