एक्स्प्लोर

BLOG : चाकरमान्यांची भ्याट

चाकरमानी! आम्हा कोकणवासियांसाठी जवळचा, आपुलीचा, हक्काचा आणि हवाहवासा वाटणारा शब्द. किमान प्रत्येक घरामागे एक माणूस मुंबईला हे चित्र नक्की दिसून येत असे. काळ बदलला आणि मोठ्या प्रमाणात कोकणवासी मुंबईची वाट धरू लागली. कधी शिक्षण, कधी घरची परिस्थिती तर कधी वाढती जबाबदारी आणि त्यातून आलेलं पोक्तेपण या साऱ्यामागे असेल कदाचित. पण, यामुळे झालं असं की गावचं घर, वाडा आणि कधीकाळी गजबजलेलं गाव शांत भासू लागलं. घरामध्ये एकतर म्हातारं माणूस, मोजकीच माणसं किंवा घर बंद असं चित्र. हे सारं काहीही असो पण, आमच्या चाकरमान्यांनी गावच्या घराकडे पाठ फिरवली असं झालं नाही. गावी कोण असेल तर त्याला शक्य तेवढं सारं काही देणं किंवा मग सणांसाठी गावी दाखल होणं. परिस्थिती काहीही असो गाव, घर, सण यांची ओढ कधी कमी झाली नाही आणि ती होणार देखील नाही. असो. तर हे सारं आठवण्यामागचं कारण म्हणजे येऊ घातलेला आमचा गणेशोत्सवाचा सण. प्रत्येक सणाला आमचा चाकरमानी आपल्या मुळगावी दाखल होतो बरं का? प्रसंगी नोकरी सोडून. कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण, सुट्टी मिळत नाही म्हणून खोटं कारण सांगून प्रसंगी नोकरी सोडून गावी आलेले शोधल्यास त्यांची संख्या मोठी असेल. पण, आता ऑफिसला पण कळून चुकलं असेल कोकणी माणूस म्हटल्यावर शिमगा, गणपती आणि त्रिपुरारी पौर्णिमेला गावी जाणारच. या साऱ्यामध्ये एक गोष्टीची आम्हाला कायम उत्सुकता असते ती चाकरमान्याकडून येणाऱ्या भेट वस्तुंची अर्थात त्याला आम्ही भ्याट देखील म्हणतो!

गावी येताना चाकरमान्यांची भ्याट आम्हा सर्वांना आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरातून येताना माझ्या भावानं, काकानं, मामानं काय काय आणलं आहे यावर आमची नजर आणि त भ्यॅट हातात केव्हा पडणार याची उत्सुकता. फळं, खाऊ, कपडे आणि अगदी मच्छि देखील कधीकाळी आम्हाला मुंबईहून येत असे. सध्या जमाना खासगी कारचा, लक्झरी गाड्यांचा आणि सुपरफास्ट ट्रेनचा आहे. गावागावांमध्ये दुकानं थाटली गेलीत. मुंबई मिळणारी एखाद्या ब्रँडची फस्ट कॉपी आम्हाला देखील सहज मिळते. ठराविक अंतरानंतर मोठ्या प्रमाणात बाजारपेठा तयार झाली आहे. मोबाईलचा वापर खुबीनं करत मार्केटिंग केली जात आहे. गावागावात इंटरनेट पोहोचलंय. एलईडी टीव्ही आलीय. दारासमोर बुलेट उभी आहे. पण, चाकरमान्याचं महत्त्व मात्र तितकंच आहे. मुंबईहून येणाऱ्या भ्याटच्या वस्तुंमध्ये काहीसा बदल झालाय. त्याचं स्वरूप बदललं आहे. पण, आपुलची आणि मिळणाऱ्या भ्याटची ओढ मात्र कायम आहे. 

काही वर्षे मागे गेल्यास गावागावांमधून मोठ्या प्रमाणावर एसटी दाखल होत. त्यांच्या टपावर अर्थात कॅरियरवर मोठ्या प्रमाणत वस्तु बांधलेल्या असत. एसटी येण्याचा एक ठराविक अंदाजे वेळ असायचा. त्यापूर्वी गावातील एसटी स्टॅन्डवर जाऊन थांबण्याची मजा काही और असायची. मुंबईहून येणाऱ्या माणसांच्या हातातील बॅग धावत धावत घेण्यामध्ये पोरांमध्ये जणू स्पर्धा असायची. मोठ्या अवधीनंतर सर्वांची भेट होणार असल्यानं मनात आनंदाच्या उकाळ्या फुटायच्या. कधी कधी तर दोन - चार गाड्या एकाच दिवशी असल्यानं आपण पुढे धावत गेलेल्या एसटीतून किंवा गाडीतून आपलं कुणी उतारलं नाही म्हटल्यावर हिरमोड व्हायचाय पुन्हा मागून येणाऱ्या गाडीकडे नजर लावून बसायची. साधारण गणपती असो अथवा शिमगा, उन्हाळ्याची सुट्टी असो अथवा गावची जत्रा चाकरमान्यांच्या वाटेकडे नजर आणि त्यांच्या येण्याची उत्सुकता मात्र सारखीच आणि कायम. 

ठराविक कालावधीनंतर चाकरमानी परतीच्या वाटेला लागल्यानंतर मन खिन्न होऊन जात असे. कारण दिवस कधी संपले यांचं भानच नसायचं. त्यात पुन्हा भेट नेमकी केव्हा होणार याचा काही नेम नसायचा. चाकरमान्यांना आणायला जाण्याची उत्सुकता त्यांना निरोप देताना देखील कायम असायची. पण, मन खिन्न असायचं.गाडीची वेळ आणि आवराआवर यामध्ये दिवस निघून जायचा. स्टॅन्डवर सोडायला गेल्यानंतर हातात किमान दहा रूपयापासून अगदी पन्नास रूपयापर्यंतची नोट पडायची. त्यामुळे पुढील किमान चार दिवस एकदम ऐश, आम्ही शेठ माणूस असायचो. आकाश जणू ठेंगणं वाटायचं. शिवाय, मुंबईला जाणाऱ्या गाडीच्या मागे झाडाची फांदी किंवा एखादी वस्तु अडकवण्यासाठी त्याचवेळी पोरांची धांदल देखील उडायची. 

हळूहळू हे सारं काही बदललं. दारात खासगी गाड्या दिसू लागल्या. पत्र, तार यांच्यांवरून चाकरमान्यांची येण्याची - जाण्याची तारीख आणि खुशाली कळणं देखील बंद झालं. कारण, गावागावत फोन बुथ आले. घरांमध्ये फोनच्या रिंग खणाणू लागल्या. आता हे सारं होत नाही तोच मोबाईल आले. व्हिडीओ कॉल, चॅटिंग सुरू झाली. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये मोठा बदल झाला. अगदी 'मुंबई - पुणे देखील वन डे रिटर्न'वर आलं. सुटकेसची जागा ब्रॅन्डेड बॅग्सनी घेतली. हे सारं काहीही असो. पण, चाकरमान्याचा महत्त्व कालही होतं, आजही आहे शिवाय उद्या देखील राहिल. कारण, चाकरमानी आणि त्याची भ्याट ही उत्सुकता आजही कायम आहे. कारण बॅग खोलल्यानंतरचा येणारा 'भ्याट सुगंध' आजही हवाहवासा आणि आपुलकीचा वाटतो. 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 27 March 2025 : 7 PMGirish Mahajan : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत, कसा घडला अपघात?Waghya Statue Issue | वाघ्याा कुत्र्याच्या स्मारकावरुन संभाजीराजे एकाकी? राऊत काय म्हणाले?Top 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 27 March 2025 : 6 Pm

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Embed widget