Guru Pushyamrut Yog 2024 : आज गुरुपुष्यामृत योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि उपाय
Guru Pushyamrut Yog 2024 : गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत’ योग तयार होतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सोनं खरेदी केल्यास त्यात वाढ होते, अशी मान्यता आहे. या गुरुपुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.

Guru Pushyamrut Yog 2024 : हिंदू पंचांगानुसार, वर्षभरात असे अनेक तिथी आणि योग येतात, जे खूप शुभ समजले जातात आणि गुरुपुष्यामृत योग त्यापैकीच एक आहे. पंचांगात या योगाचं (Yog) विशेष महत्त्व आहे. हा योग शुभ कार्य, खरेदी, गुंतवणूक आणि व्यवसायासाठी शुभ मानला जातो. त्यानुसार, माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग (Guru Pushyamrut Yog 2024) आज, म्हणजेच 22 फेब्रुवारी 2024 रोजी जुळून आला आहे. या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व असतं. आजच्या दिवसाचं महत्त्व, खरेदीसाठीचा शुभ मुहूर्त आणि उपाय जाणून घेऊया.
गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व (Guru Pushyamrut Yog Significance)
गुरु पुष्य योगात सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. या योगात नवीन व्यवसाय सुरू करण्याचाही काहींचा विचार आहे. हा शुभ योग वर्षातून सहसा दोन किंवा तीन वेळा येतो. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरु पुष्य योग तयार होतो. हा दिवस गुरु पुष्य नक्षत्र म्हणून देखील साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः भाग्यवान मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात.
गुरुपुष्यामृत योग तिथी आणि शुभ मुहूर्त (Guru Pushyamrut Yog Tithi)
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुपुष्यामृत योग आज, म्हणजेच 22 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. गुरुपुष्यामृत योग सकाळी 06.48 पासून सुरू होऊन तो दुसऱ्या दिवशी सकाळी 04.43 पर्यंत असेल
पहिला शुभ मुहूर्त : सकाळी 06.48 ते सकाळी 08.27
दुसरा शुभ मुहूर्त : सकाळी 11.00 ते दुपारी 03.29
पुष्य नक्षत्राचे महत्त्व (Guru Pushya Nakshatra Significance)
बृहस्पती देव यांचा जन्मही याच नक्षत्रात झाला. तैत्रिय ब्राह्मणात असे म्हटलं आहे की, बृहस्पती प्रथम जयमनः तिष्यम् नक्षत्र अभिसं बभूव.. नारद पुराणानुसार, या नक्षत्रात जन्मलेला व्यक्ती बलवान, दयाळू, धार्मिक, धनवान, विविध कलांचा जाणकार आणि सत्यवादी असतो. सुरुवातीपासून या नक्षत्रात केलेली सर्व कामं शुभ मानली जातात, परंतु देवी पार्वतीच्या विवाहाच्या वेळी शिवाकडून मिळालेल्या शापामुळे हे नक्षत्र पाणिग्रहण विधींसाठी वर्ज्य मानलं जातं.
गुरुपुष्य योगात करण्याचे उपाय (Guru Pushya Remedies)
महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा करा. पूजेमध्ये 'ओम श्रीं ह्रीं दारिद्रय विनाशिन्ये धनधान्य समृद्धि देहि देहि नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करा.
या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करा.
या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. तर नोकरदार वर्गानेही गुरु पुष्य योगात लक्ष्मीची पूजा करावी.
गुरु पुष्य योगात एकाक्षी नारळाची पूजा करा.
गुरु पुष्य योगाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचे चमत्कारीक कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
