Astrology : आज गजकेसरी योगासह बनले मोठे शुभ योग; 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशाची आवक वाढणार
Panchang 30 January 2025 : आज गुरुवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी गजकेसरी योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 30 January 2025 : आज म्हणजेच 30 जानेवारीला अनेक शुभ संयोग घडत आहेत. आजपासून माघ मासातील शुक्ल पक्षाची पहिली तिथी सुरू होत आहे. आणि आज गुरुवार आहे. गुरुवारी चंद्र कुंभ राशीत जात असून त्यामुळे गुरु आणि चंद्र यांच्यामध्ये गजकेसरी योग तयार होत आहे. या योगामुळे आजचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वांगीण लाभदायक राहील. आज नशीब तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मेहनतीपेक्षा जास्त फायदा देईल. नोकरीत बदलासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज यश मिळेल. नोकरीमध्ये तुमच्या कल्पनांचं स्वागत केलं जाईल आणि अधिकारी तुमच्यावर खूश होतील, तुम्हाला ते बढती देऊ शकतात. कौटुंबिक जीवनात परस्पर प्रेम आणि सहकार्य राहील. आज तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळेल. ज्या लोकांचा व्यवसाय दागिने आणि कपड्यांशी संबंधित आहे, त्यांनाही विशेष लाभ मिळेल.
तूळ रास (Libra)
आज तुम्हाला तुमच्या नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. तुमची प्रलंबीत इच्छा पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने तुम्हाला आज काही मोठे लाभ मिळू शकतात. राजकीय क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रात तुमचं कोणतंही काम अडकलं असेल तर ते पूर्ण होऊ शकतं. तुमची कमाई वाढवण्यासाठी तुम्ही काही स्रोत शोधाल ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज व्यवसायात तुमच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तूळ राशीचे विद्यार्थी शिक्षणात चांगली कामगिरी करू शकतील. तुमच्या भौतिक सुखसोयीही वाढतील.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना आज सरकारी कामात यश मिळेल. तुमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होईल. हरवलेली वस्तू सापडल्याने तुम्हाला आनंद होईल. दूर राहणाऱ्या नातेवाईकाकडून आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून काही फायदा होऊ शकतो. तुमची कोणतीही अडचण वडिलांच्या सल्ल्याने सोडवली जाईल. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत टीमवर्कचा फायदा होईल आणि तुमचे काही महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण झाल्याने तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. व्यवसायात चांगली कमाई झाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

