Potato Production : आसाममध्ये बटाटा उत्पादनात लक्षणीय वाढ, बियाणांसह बटाटा उत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण बनवण्याचं लक्ष
आसाममध्ये (Assam) बटाटा उत्पादनात (Potato Production) लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती आसामचे कृषी मंत्री अतुल बोरा (Atul Bora) यांनी दिली आहे.
![Potato Production : आसाममध्ये बटाटा उत्पादनात लक्षणीय वाढ, बियाणांसह बटाटा उत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण बनवण्याचं लक्ष Potato Production News Significant increase in potato production in Assam Information from Agriculture Minister Atul Bora Potato Production : आसाममध्ये बटाटा उत्पादनात लक्षणीय वाढ, बियाणांसह बटाटा उत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण बनवण्याचं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/1a821bfebf536bb30dc9d9375cd2138c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Potato Production : आसाममध्ये (Assam) बटाटा उत्पादनात (Potato Production) लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती आसामचे कृषी मंत्री अतुल बोरा (Agriculture Minister Atul Bora)
यांनी दिली आहे. आसाममध्ये बटाट्याचे उत्पादन प्रति हेक्टर सात मेट्रिक टनांवरुन 17 मेट्रिक टन प्रति हेक्टरपर्यंत वाढल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आसाम हे कृषी आणि पशुवैद्यकीय क्षेत्रात स्वावलंबी राज्य आहे. देशातील इतर राज्यांवर आम्ही अवलंबून नसल्याचेही ते म्हणाले. विविध संकटांचा सामना करत शेतकरी बटाट्याचे उत्पादन करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
आसाम सरकारच्या फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया विभागातर्फे बटाटा कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोरा बोलत होते. फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया विभागातर्फे ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (APART) आणि आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र (CIP) यांच्या सहकार्याने आसाम राज्यात बटाटा मूल्य साखळी विकसित करण्यासाठी केली जाते. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
आसाम कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पा अंतर्गत आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्रात वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच प्रमाणित बियाणे आणि बटाटा उत्पादनात आसामला स्वयंपूर्ण बनवणे हे कृषी विभागाचं उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी अतुल बोरा यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या आसाममध्ये बटाचा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. बटाट्याचे उत्पादन प्रति हेक्टर सात मेट्रिक टनांवरुन 17 मेट्रिक टन प्रति हेक्टरपर्यंत वाढले आहे.
हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्याचे मोठं आव्हान
दरम्यान, यावेळी बोलताना कृषीमंत्री अतुल बोरा यांनी हवामान बदलाच्या संदर्भातही माहिती दिली. हवामान बदलाचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसत असल्याचे ते म्हणाले. सध्या जगावर हवामान बदलाचं मोठं संकट आलं आहे. आसाम राज्यातही हवामानात तीव्र बदल होत आहेत. आम्तर, राज्यातील शेतकरी या सघळ्या अडचणींचा सामना करत आहेत. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगले उत्पादन घेत आहेत. दरम्यान, हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्याचे मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. याबाबत कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य त्या प्रकारचे मार्गदर्शन करणं गरजेचं असल्याची माहिती देखील कृषीमंत्री अतुल बोरा यांनी दिली. राज्याच्या नवीन पिढीला त्यांच्या स्वयंरोजगारासाठी कृषी उत्पादन क्षेत्रात रस आहे. तरुण कृषी क्षेत्रात विशेषत: फलोत्पादनात अनेक प्रयोग करत असल्याची माहिती देखील बोरा यांनी दिली. दरम्यान, यावर्षीच्या खरीप हंगामात बटाटा आणि कांद्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली लागवड समान पातळीवर असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)