Kharif sowing : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा आणि बटाट्याची लागवड सम पातळीवर, तर टोमॅटोच्या लागवडीत वाढ
या खरीप हंगामात बटाटा आणि कांद्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली लागवड समान पातळीवर असल्याचे दिसत आहे.
Kharif sowing : सध्या देशातील बहुतांशी भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. चांगल्या पावसामुळं शेतीच्या कामांना वेग आला आहे. सध्या शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी (Kharif sowing) केलेली आहे. तर काही ठिकाणी अद्यापही शेतकरी काही पिकांची लागवड करताना दिसत आहेत. दरम्यान, या खरीप हंगामात बटाटा आणि कांद्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली लागवड समान पातळीवर असल्याचे दिसत आहे. तर टोमॅटोच्या लागवडीत वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी यावेळी जेवढ्या क्षेत्रावर पेरणी झाली होती, तेवढ्याच क्षेत्रावर सध्या पेरणी झली आहे. याबाबतची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 5 जुलै रोजी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या पाच प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये कांद्याचे एकूण क्षेत्र 26 हजार 840 हेक्टर आहे. तर 2021 मध्ये याच कालावधीत कांद्याचे एकूण क्षेत्र हे 26 हजार 670 हेक्टर होते. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या प्रमुख पाच राज्यांमध्ये खरीप बटाट्याचे एकूण क्षेत्र 5 जुलै रोजी 36 हजार 120 हेक्टर होते. जे एका वर्षापूर्वी 36 हजार 510 हेक्टर होते.
पहिल्या 10 उत्पादक राज्यांमध्ये खरीप टोमॅटो लागवडीखालील एकूण क्षेत्र 5 जुलैला 58 हजार 750 हेक्टर होते. जे एका वर्षापूर्वी 50 हजार 990 हेक्टर होते. हे लक्ष्यित क्षेत्राच्या जवळपास 23 टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा टोमॅटोच्या लागवडीत मोठ वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दराचा चांगला परिणाम झाला आहे. लागवडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
टोमॅटोचे भाव घसरले असतानाच, गेल्या आठवडाभरात कांदा आणि बटाट्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. केंद्राने 2022-23 मध्ये बफरसाठी 2.50 लाख टन कांदा खरेदी केला आहे. जो 2021-22 मध्ये तयार केलेल्या दोन लाख टन बफरपेक्षा 50,000 टन जास्त आहे. नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) द्वारे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून किंमत स्थिरीकरणासाठी रब्बी हंगामात कांद्याची खरेदी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या:
- Wheat prices : गेल्या सहा आठवड्यात गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ, बिस्किटे, ब्रेड यासारखे पदार्थ महागणार
- Marathwada: मराठवाड्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; पंचनामे सुरु