अधिकारी अन् कर्मचारी रिल्स टाकतात, काम भासवतात; विधानसभेत 'लक्ष्य'वेधी, मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रिल्स टाकतात. यातून राज्य तेच चालवतात असा भास निर्माण करतात. यासंदर्भात कडक नियम आणि कारवाई करणे आवश्यक आहे अशी लक्षवेधी भाजप आमदार परिणय फुके यांनी मांडली.
CM Devendra Fadnavis : अधिकारी आणि कर्मचारी वर्ग रिल्स टाकतात. यातून राज्य तेच चालवतात असा भास निर्माण करतात. यासंदर्भात कडक नियम आणि कारवाई करणे आवश्यक आहे अशी लक्षवेधी भाजप आमदार परिणय फुके (MLA Parinay Phuke) यांनी मांडली होती. यांच्या या लक्षवेधीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे. यासंदर्भात सविस्तर जीआर केला जाईल, बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत, असं मी आश्वासित करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
नियम तयार झाले तेव्हा सोशल मीडिया नव्हते. आपल्या ड्युटीला ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न अधिकारी देखील करतात. सिटिजन एन्गेजमेन्ट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर व्हावा. यासंदर्भात कडक नियम तयार करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सेवा शर्थीचे नियम आहेत 1989 चे त्यात वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग आणि वर्तवणूकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात सविस्तर जीआर काढला जाणार आहे. बेशिस्त खपवून घेतले जाणार नाही असं मी आश्वासित करतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























