Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
हेही वाचा :
नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात देखील नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत येणाऱ्यांना पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट वाटप करण्यात आले. सदर प्रकार समोर आल्यानंतर कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.