Horoscope Today 9 March 2025 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 9 March 2025 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 9 March 2025 : आज 9 मार्चचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी बॉसकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. त्या उत्तमरित्या पार पाडा. तसेच, मित्रांबरोबर हसत-खेळत दिवस घालवाल. आज अनेक दिवसांपासून मनात असलेल्या गोष्टी तुम्ही मित्रांबरोबर शेअर कराल. त्यामुळे तुम्हाला थोडं हलकं वाटेल.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक भरभराटीचा असणार आहे. आज तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, तुमची जी काही महत्त्वाची कामे आहेत ती आज पार पाडण्याचा प्रयत्न करा. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख-शांतीचा असणार आहे. आज तुम्हाला कोणाचाच त्रास होणार नाही. तसेच, सुट्टीचा देखली तुम्ही चांगला आनंद घ्याल. आज दूरचे नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात. त्यांना पाहून देखील तुम्हाला आनंदच होणार आहे. निरोगी जीवनशैलीचे पालन करा.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. आज तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. मात्र, अति आत्मविश्वास दाखवू नका. गाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमचे निर्णय फसण्याची शक्यता आहे. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा.
सिंह रास (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या बाबतीत फार संयम ठेवावा लागेल. अनेकजण तुमच्या याच संयमाची परीक्षा घेऊ शकतात. त्यामुळे याला बळी पडू नका. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, आहारात सकस आहार घ्या. ध्यान करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, आज तुमच्या व्यवसायात देखील चांगली गती पाहायला मिळेल. नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. आज तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्ततेचा असणार आहे. तुम्हाला कोणत्याच कामात घाईगडबड करुन चालणार नाही. तसे वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आज काही प्रभावशाली लोकांबरोबर तुमच्या गाठीभेटी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकता येईल. तसेच, विवाहात येणारे अडथळे दूर होतील.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी पाहायला मिळेल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आज तुमच्या कामात तुम्ही व्यस्त असाल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करा आणि मगच निर्णय घ्या. सामाजिक क्षेत्रात तुमचा चांगला मान-सन्मान वाढलेला दिसेल. जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल. तसेच, आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल. विविध स्त्रोतांमधून तुमच्यासाठी उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यावर जर एखाद्या कामाचा तणाव असेल तर तो आज कमी होईल. तसेच, तुमच्या कुटुंबात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख-समृद्धीत भरभराटीचा असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना चांगलं प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक केलं जाईल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात येणार अडथळे हळुहळू दूर होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















